◻️ लोणी बुद्रुक येथे वटपौर्णिमेनिमित्ताने महिलांना वटवृक्ष रोपाचे वितरण
संगमनेर LIVE (लोणी) | अंधश्रद्धेला बळी न पडता आपण कितीही मोठ्या पदव्या घेवून कितीही शिकलो तरी घरातील व समाजातील जुण्या जाणत्या मोठ्या माणसांनी दिलेला सल्ला हा जीवनाला निश्चितच वेगळी दिशा देणारा असतो असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
सामाजिक वनीकरण विभाग अहमदनगर व राहाता वन परिक्षेत्र यांच्या वतीने लोणी बुद्रुक येथे वटपौर्णिमेनिमित्ताने महिलांना वटवृक्ष रोपाचे वितरण करण्यात आले याप्रसंगी सौ. विखे पाटील बोलत होत्या.
यावेळी उपसरपंच गणेश विखे, राहाता बाजार समितीचे संचालक राहुल धावणे, सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक धावणे, लक्ष्मण विखे, मधुकर विखे, किशोर धावणे, डॉ. वैशाली म्हस्के, सौ. मंजुश्री साबळे, जेष्ठ पत्रकार दादासाहेब म्हस्के, नवनित साबळे, बाळासाहेब विखे, भाऊसाहेब विखे यांच्यासह सामाजिक वन विभागाचे विभागीय अधिकारी एस. बी. कंद, पी. बी. पठाण, एस. व्ही. हुदलीकर, एस. बी. दळवी, आर. फ. जाधव, एस. ए. मदने, प्रिया चव्हाण आदीसह महीला उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आपल्या मार्गदर्शन सौ. विखे पाटील म्हणाल्या की, जुन्या रूढी आणि शास्त्र याला विज्ञान दृष्टीकोन आहे. वटपौर्णिमा ही पर्यावरण संवर्धन करा हा संदेश देत असते, महीलांनी रूढी-परंपरांचे पालन करतांना आपण खुप शिकलो म्हणून ही प्रथा का पाळाची हा गैरसमज दूर करून या मागील शास्त्र समजून घेत पुढे जाण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
जुन्या व आत्ताच्या नव्या पिढीमध्ये फरक असला तरी पुर्वीच्या लोकांनी आपल्याला जे काही सांगितले आहे त्यात मोठ्या प्रमाणात तथ्य असते. म्हणूनच जुण्या लोकांचे विचार सांभाळण्याचे काम आपल्याला करावे लागेल असे त्या शेवटी म्हणाल्या.
सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय अधिकारी एस. बी. कंद यांनी पर्यावरण संवर्धन करतांना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुरु केलेल्या मेरी लाईफ ही मोहीम सुरू करून वृक्षारोपण, पाणी व्यवस्थापन, स्वच्छता आणि आरोग्याची काळजी, प्लॉस्टिक मुक्ती, आहार आणि आरोग्य या मोहीमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
आपल्यातील काही महिलांना आता सुना देखील आल्या असल्या तरी सुनेला आपल्या लेकीप्रमाणेच सांभाळण्याचे दायित्व पुर्ण करण्याचा सल्लाही त्यांनी उपस्थित महिलांना सौ. विखे यानी दिला.