◻️ संगमनेर तालुक्यात तिसरा तर अहमदनगर जिल्ह्यात ११ व्या क्रमांकाने उत्तीर्ण
संगमनेर LIVE | सगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी साई भानुदास सातपुते याची जवाहर नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी पुढील शिक्षणासाठी निवड झाली असून या विद्यार्थ्यासह पालकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
साई सातपुते हा सहाव्या इयत्तेत शिकत असुन नवोदयच्या परिक्षेत तो संगमनेर तालुक्यात तिसरा तर अहमदनगर जिल्ह्यात ११ वा आला आहे. त्यामुळे शासनाच्या जवाहर नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर येथे पुढील शिक्षणासाठी त्याची निवड झाली. नम्र स्वभाव, अभ्यासू वृत्ती, जिद्द, शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन व आई वडिलांची अभ्यासासाठी सततची प्रेरणा यामुळे साई नेहमी अभ्यासामध्ये अग्रेसर राहिऊ आहे.
दरम्यान साईच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक विनायक भोसले, शिक्षक अशोक बोर्डे, शिक्षिका कुसुम साबळे, अश्वीनी धिरडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, रामनाथ शिंदे व परिसरातील ग्रामस्थांनी साईच्या या यशाचे कौतुक व अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.