◻️ आश्वी खुर्द येथील १९८६ बॅच च्या विद्यार्थ्यानी साजरा केला बालपणीच्या क्षणांचा स्मृती गंध
संगमनेर LIVE | दिव्याने दिवा लावत गेलं कि दिव्यांची एक दीपमाळ तयार होते आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं. हे नातं चिरकाळ टिकवण्यासाठी गरजेचं असतं ते सतत भेटत राहणे. याच अनुषंगाने, प्रवरा ग्रामिण शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन आश्वी खुर्द येथील १९८६ बॅच च्या विद्यार्थ्यानी एकत्र येऊन बालपणीच्या क्षणांचा नुकताच स्मृती गंध साजरा केला आहे.
या माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक चंद्रभान केकाण, विठल मुळे, कैलास पाबळ, श्रीमती गोंधळे, श्रीमती काळे, म्हस्के व मांढरे आदि आवर्जून उपस्थित होते. याप्रसंगी माजी विद्यार्थी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच आपल्या सर्वाचे हे मैत्रीचे बंध आयुष्यभर असेच अखंड राहो आणि यापुढेही आपण सर्व एकमेकांच्या संपर्कात राहू आणि एकमेकांच्या सुख दुःखाचे भागीदार होऊ हीच अपेक्षा यावेळी सर्व मित्र मैत्रिणींनी व्यक्त केली.
याप्रसंगी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतनच्या सन १९८६ च्या बँचचे विद्यार्थी पांडुरग सांगळे, मारुती घुगे, गंगाधर म्हस्के, काशिनाथ सरोदे, कैलास जाधव, दत्ता यादव, सुर्यभान नागरे, किशोर जगताप, अर्जुन गिते, गोकुळ घुगे, खंडु घुगे, दत्ता तळोले, किसन नागरे, संजिवन दिवे, फ्रान्सीस मुन्तोडे, राजेंद्र सोनवणे, दत्तु गिते, पंढरीनाथ गिते, सुभाष चतुरे, कांतीलाल बोंन्द्रे, बबन घुगे, पांडुरंग घुगे, लक्ष्मण पाबळ, रामा घुगे, सौ. कमल गव्हाणे, अलका गिते, मैनाबाई क्षिरसागर, संगिता सोनवणे, आशा भुसाळ, ज्योती काळे, लता काळे, हिरा कुऱ्हाडे आदि उपस्थित होते.
दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास जाधव व आभार प्रदर्शन दत्तु गिते यांनी केले. तर या माजी विद्यार्थी मेळाव्याचे यशस्वी आयोजन १९८६ बॅच च्या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन केले होते.