◻️ ७ लाख ६२ हजाराचा मुद्देमाल लंपास
◻️ पाच लाख रुपये व त्यापेक्षा अधिक किमंतीचे सोने, दिड किलो चांदी यासह १ लाख रुपये रोख रक्कमेचा समावेश
◻️ रस्ता लुटीच्या घटनेने व्यापारी वर्गासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये भिंतीचे वातावरण
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी शिवारात सोमवार दि. २६ जून रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमार दोन अज्ञात चोरट्यांनी सोन्या - चांदीचे व्यापारी प्रसाद पंडितराव नांदुरकर यांच्या डोळ्यात मिर्ची पुड टाकून तब्बल ७ लाख ६२ हजार १२५ रुपये किमतीचे सोन्या - चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम लुटून पोबारा केल्याची घटना उघडकीस आल्याने व्यापाऱ्यासह नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत आश्वी पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, सोन्या चांदीचे व्यापारी प्रसाद पंडितराव नांदुरकर यांचे निमगावजाळी येथे सोनाराचे दुकान आहे. सोमवार दि. २६ जून रोजी ते सायंकाळी ८ विजेच्या सुमारास निमगावजाळी - गोगलगाव रस्त्याने घराच्या दिशेने चालले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यात मिर्ची पुड टाकली व नांदुरकर यांना मारहाण करत त्याच्या हातात असलेली दागिन्यांची पिशवी घेऊन पळून गेले आहेत.
या पिशवीत १७ हजार रुपये किमंतीचे कानातले दोन जोड, ४६ हजार ७५० रुपये किमंतीचे चैन टॉप्स ४ जोड, २९ हजार ७५० रुपये किमंतीचे पेडल, ५१ हजार रुपये किमंतीचे सोन्याचे मणी, ३८ हजार २५० रुपये किमंतीच्या कानातील बाळ्याचे १३ जोड, २५ हजार ५०० रुपये किमंतीचे कानातील झुबे दोन जोड, २९ हजार ७५० रुपये किमंतीच्या महिलांच्या ३ अंगठ्या, २५ हजार ५०० रुपये किमंतीचे घुंगर टॉप्स ३ नग,
६८ हजारांच्या मुरण्या ४० नग, ५५ हजार २५० रुपये किंमतीची जुनी मोड गोळी, ३२ हजार ५०० रुपये किमंतीच्या महिला व पुरुषाच्या चांदीच्या १५० अंगठ्या, १ लाख ४५ हजार रुपये किमंतीच्या तोरड्याचे १५० जोड, ९७ हजार ८७५ रुपये किमतीचे चांदीचे कडे व जोडले तसेच १ लाख रुपये रोख असा एकून ७ लाख ६२ हजार १२५ रुपये किमंतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
यामुळे आश्वी पोलीस ठाण्यात गुरंव नंबर १५७/२०२३ नुसार भादंवी ३९४, ३४ प्रमाणे अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी पवार हे पुढील तपास करत आहे.
दरम्यान सोने - चांदी लुटीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कर्तव्यदक्ष पोलीस पाटील दिलीप डेंगळे यांनी घटनास्थळी जाऊन जखमी प्रसाद नांदुरकर यांची मदत करत आश्वी पोलीसाना या घटनेची माहिती कळवली होती. तर ही घटना उजेडात आल्यामुळे व्यापारी वर्गासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले असून या चोरट्यांना जेरबंद करण्याचे मोठे आवाहन आश्वी पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.
टिप**** सदर बातमी संगमनेर LIVE च्या पुर्व परंवागीशिवाय इतर कोणत्याही न्यूज पोर्टल अथवा दैनिक यानी कॉपी राईट करु नये, अन्यथा बातमी ज्या ग्रुप अथवा इतर ठिकाणी शेअर केली जाईल तेथे त्या न्यूज पोर्टलची लाईकी दाखवली जाईल.
कळावे, संगमनेर LIVE