◻️ दुधाला रास्तभाव दिल्याने शेतकरी संघटनेकडून मंत्री विखे पाटील यांचा सत्कार
संगमनेर LIVE (शिर्डी) | शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मत राज्याचे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. गायीच्या दूधाला प्रतिलिटर किमान ३४ रूपये भाव देण्याचा महत्वपूर्ण आणि शेतकरी हिताचा निर्णय शासनाने घेतल्याबद्दल राज्याचे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा रयत क्रांती संघटनेसह विबिध संघटनाच्यावतीने मुंबईत सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
राज्यात दूधाला किमान भाव मिळावा, दूधाच्या खरेदी दरात कपात होऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होऊ नये या उद्देशाने गायीच्या दूधाला प्रतिलिटर किमान ३४ रूपये भाव देण्याचा महत्वपूर्ण आणि शेतकरी हिताचा निर्णय शासनाने घेतल्याबद्दल रयत क्रांती संघटनेच्यावतीने आज विधिमंडळ प्रांगणात सत्कार करण्यात आला. यावेळी शाल पुष्पगुच्छ आणि आभारपत्राची फ्रेम भेट देण्यात आली. पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागात विखे पाटील यांनी घेतलेल्या विविध निर्णयाबद्दल स्तुती केली. तसेच शेतकऱ्यांच्यावतीने त्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमास रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले, महिला आघाडीच्या अध्यक्षा निताताई खोत, पुणे जिल्हा अध्यक्ष गजानन गांडेकर, बीड जिल्हा अध्यक्ष संदीप वाहुळे, सांगली जिल्हा युवा अध्यक्ष किरण उथळे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी बंधू-भगिनी उपस्थित होते.