◻️ देवीदास नांगरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी तर सौ. गायत्री चितळकर आणि प्रदीप देठे यांच्या लिपिक पदावर निवडी
◻️ महसूल मंत्री आणि संस्थेचे अध्यक्ष ना. विखे पाटील यांच्या संकल्पनेतून प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्राची स्थापना
संगमनेर LlVE (लोणी) | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत हिमांशू देवीदास नांगरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी तर सौ. गायत्री बबन चितळकर आणि प्रदीप जगन्नाथ देठे यांची लिपिक या पदावर निवड झाली हे तीनही विद्यार्थी हे प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्रातील आहेत.
महसूल मंत्री आणि संस्थेचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून परिसरातील विद्यार्थ्यांसाठी लोकतेने पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्राची स्थापना करण्यात आली. परिसरात ठिकठिकाणी अभ्यासिका विकसित करण्यात येत आहेत. आज यातून अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यश संपादन करीत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नुकताच काही परीक्षांचा निकाल जाहीर झाला यात २०२० च्या परीक्षेत प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्राच्या राहता अभ्यासिकेतील हिमांशू नागरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. तसेच २०२१ ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत सौ. गायत्री चितळकर आणि प्रदीप जगन्नाथ देठे यांची लिपिक या पदावर निवड झाली.
या यशाबद्दल महसूल मंत्री आणि संस्थेचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील, विश्वस्त माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा माजी सौ. शालिनीताई विखे पाटील, खा. डाॅ. सुजय विखे पाटील, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे पाटील, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी डाॅ. शिवानंद हिरेमठ, संस्थेचे अतांत्रिकचे संचालक प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे, संस्थेच्या संचालिका सौ. लीलावती सरोदे, आश्वी महाविद्यालयाचे कॅम्पस संचालक डॉ. रामनाथ पवार, कोल्हार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिभाऊ आहेर आणि राहता महाविद्यालयाचे कॅम्पस संचालक डॉ. महेश खर्डे, ट्रेंनिग आणि प्लेसमेंट सेलचे प्रमुख मनोज परजणे, स्पर्धा परीक्षा सेलचे समन्वयक डॉ. शैलेश कवडे आणि संचालक यांनी अभिनंदन केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ना. राधाकृष्ण विखे पाटील परिसरात अभ्यासिका सुरु केल्या. यांचा मोठा फायदा झाला. या माध्यमातून या परिसरातील विद्यार्थ्यांना एक अभ्यास मंच प्राप्त होत आहे. पुण्यात अभ्यास करताना दर महिन्याला दहा हजा रुपये खर्च येतो त्या खर्चात संपूर्ण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास ग्रामीण भागात झाला. पोलीस उपनिरीक्षक पदाचा निकाल लागल्यावर आईच्या डोळ्यातून आलेले आनंद अश्रू हाच सर्वात मोठा सत्कार अशी प्रतिक्रिया हिमांशू नागरे पाटील यांनी दिली.