◻️ स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कामगिरी
◻️ २४ लाख ८० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात
◻️ संगमनेर तालुका, संगमनेर शहर पोलीस ठाण्यासह जिल्ह्याबाहेर गुन्हे दाखल
संगमनेर LIVE | नगर येथील राजु ठोकळ (वय - ५४) यांनी घराजवळ लावलेली ५० हजार रुपये किंमतीची रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट मोटार सायकल अनोळखी आरोपींनी चोरुन नेली असल्याची फिर्याद कोतवाली पोलीस स्टेशन ७२३/२०२३ भादविक ३७९ प्रमाणे दाखल केली होती.
त्यामुळे पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना चोरीचे गुन्हे उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.
पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ मनोहर गोसावी, पोना रविंद्र कर्डीले, भिमराज खर्से, संदीप दरदंले, संतोष खैरे, फुरकान शेख, विजय ठोंबरे, पोकॉ जालिंदर माने, अमृत आढाव, मेघराज कोल्हे व चापोकॉ अरुण मोरे अशा पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुण मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकिस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या.
यावेळी पथक नगर शहर परिसरात फिरुन आरोपींची माहिती घेताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, वैभव सुरोडे, (रा. आष्टी, जिल्हा - बीड) याने अहमदनगर शहरातील विनायक नगर येथुन चोरी केलेली बुलेट मोटार सायकलवर साथीदारासह शेवगांव मार्गे, ब्राम्हणी, ता. राहुरी येथील किरण गर्जे व सोमनाथ हारेल यांना देण्यासाठी येणार आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी मी माहिती पथकास कळवुन कारवाई करणे बाबत योग्य त्या सुचना दिल्या.
सुचना मिळताचं पथकाने शेवगांव - गेवराई रोडवरील नित्यसेवा हॉस्पीटल जवळ सापळा लावला. यावेळी ९ वा. दोन इसम काळ्या रंगाच्या विनानंबर बुलेट मोटार सायकलवर येताना दिसले. त्यामुळे पथकाने बुलेटवरील इसमांना थांबण्याचा इशारा करताच त्यांनी ताब्यातील बुलेट रस्त्याचे कडेला थांबवली. बुलेटवरील दोन्ही इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे वैभव ऊर्फ सोमा सुरोडे (वय - २५, जिल्हा बीड) व किरण गर्जे (वय - २५, ता. नेवासा) असल्याचे सांगितले.
त्यांच्याकडे ताब्यातील बुलेट बाबत विचारपुस केली असता अहमदनगर शहरातील विनायक नगर येथुन चोरी केली असुन ब्राम्हणी, ता. राहुरी येथील किरण गर्जे व त्याचे काका सोमनाथ हारेल यांना देण्यासाठी जात असल्याची कबुली दिली. तर अधिक चौकशी केली असता त्यांनी त्याचे इतर साथीदार दादा मोरे (रा. कोपरगांव), विशाल सदगिर, (जिल्हा नाशिक), आद्दु शेख (रा. जामखेड), महेश सोनवणे (श्रीरामपूर), किरण गर्जे (नेवासा) व सोमनाथ हारेल (राहुरी) यांचे सोबत अहमदनगर, बीड, नाशिक व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातुन बुलेट व ट्रॅक्टर चोरी केल्याची माहिती दिल्यानतंर अहमदनगर, बीड, नाशिक व छत्रपती संभाजीनगर जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी केल्यानंतर कोतवाली, संगमनेर तालुका, संगमनेर शहर, आष्टी, कन्नड शहर, वैजापूर, वावी याठिकाणी आठ गुन्हे उघडकिस आले आहेत.
तर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींचे कब्जातुन १४ लाख रुपये किंमतीचे महिंद्रा व जॉन डिअर कंपनीचे दोन ट्रॅक्टर व १० लाख ८० रुपये किंमतीच्या रॉयल इनफिल्ड कंपनच्या सह बुलेट मोटार सायकल असा एकुण २४ लाख ८० हजार रुपये किंमतीचे मुद्देमाल ताब्यात घेवुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे.
दरम्यान ही कारवाई अहमदनगरचे पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.