◻️ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून झाली निवड
संगमनेर LIVE (लोणी) | लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील गृह विज्ञान व संगणक महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ. अनुश्री राजेंद्र खैरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेअंतर्गत गृह विज्ञान च्या तदर्थ अभ्यासमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
उपक्रमशील असलेल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ. अनुश्री राजेंद्र खैरे याची निवड महाविद्यालयाच्या आणि संस्थेच्या दृष्टीने अतिशय गौरवाची व अभिमानाची बाब असल्याचे सांगण्यात आले आहे.
डॉ. खैरे यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, प्रवरा अभिमित विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्यासह संस्थेचे अतिरिक्त संचालक डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे पाटील, अतांत्रिक विभागाचे संचालक डाॅ. प्रदिप दिघे यांच्यासह सर्व अधिकारी व पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.