संगमनेर तालुक्यात विकासकामे सुरूच राहणार - आ. बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0

◻️राजापूर - घुलेवाडी - चिकणी सह विविध रस्त्यांची कामे मार्गी

◻️रस्त्याच्या कामाचा मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ 

संगमनेर LlVE | संगमनेर तालुक्यातील जनता व पक्ष नेतृत्वाच्या विश्वासामुळे राज्यभरात काम करण्याची संधी मिळाली व त्यातून निळवंडेसह अनेक मोठमोठी विकास कामे मार्गी लावली. मात्र सरकार बदलले आणि विकास कामाना शिंदे सरकारने स्थगीती दिली. विधानसभेत आवाज उठून आपन ती स्थगिती उठवली. अडचनी आल्या त्या सोडवल्या जात असून तालुक्यातील विकास कामे सुरूच राहतील असे प्रतिपादन माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले असून राजापूर - घुलेवाडी - चिकणी या रस्त्यासह तालुक्यातील विविध रस्त्यांची कामे मार्गी लागली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

आमदार थोरात यांच्या पाठपुराव्यातून मंजूर झालेल्या घुलेवाडी फाटा ते गुंजाळवाडी - राजापुर ते चिकणी व राजापूर ते चिखली फाटा या रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी मा. आ. डॉ. सुधीर तांबे, आर. एम. कातोरे, संपतराव डोंगरे, अजय फटांगरे सिताराम राऊत, संतोष हासे, नवनाथ आरगडे, चंद्रकांत कडलग, विष्णुपंत रहाटळ विलास वर्पे, आर. बी. सोनवणे, भारत वर्पे, माधव हासे, बाबासाहेब गायकर, आनंद वर्पे, सरपंच सौ. निर्मला राऊत, सरपंच ज्योती कडलग, उपसरपंच प्रमोद कडलग, सी. के. मुटकुळे, डी. एम. लांडगे, सोमनाथ गोडसे, अतुल कडलग, प्रकाश कडलग आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आ. थोरात म्हणाले की, राजापूर - घुलेवाडी रस्त्याची मागणी खुप दिवसांची होती. ती आता पूर्ण होत आहे. संगमनेर तालुका खुप मोठा आहे. विकास कामे करताना ओढाताण होतच असते. तालुक्यातील प्रत्येक गावाला, वाडीला निधी दयावा लागतो. त्यातून कामे होत असतात. मात्र विकास कामे करताना आपन कधीही कमी पडलो नाही. सत्ता नसली तरी आपन सर्वाच्या सहकाऱ्याने कामे मार्गी लावत असतो. मात्र दृष्ट लागावी यासाठी एखादा लागतोच. त्याचेच काही ख़बरी त्रास देत आहे. साधे गाईच्या गोठ्यात मुरूम टाकायचा तरी हे खबरी ट्रैक्टर पकडून देतात, कनोलीच्या तलाठ्याला मंत्री स्वत: फोन करतात की वाळू वाहतुक करून देवु नका, गौण खनीजाचा वापर सामान्य लोकाच्या विकासकामासाठीच होतो. मात्र त्याच्यावरही बंदी हे कसले राजकारण अशा राजकारणाचा आपल्या तालुक्यात काहीही उपयोग नाही. हा होणारा त्रास गणेश च्या निवडणुकीमुळे थोड्याफार प्रमाणात कमी झाला आहे. निळंवडे धरणाचे व कालव्यांची कामे आपण अनेक अडचणीवर मात करून पूर्ण केली. पिचडानी मदत केली. मात्र ज्याचे योगदान नाही त्यानी पाटाचे पानी बंद केले. जनतेचा आनंद त्याना बघवला नाही. रस्त्याची कामे गुणवत्तापूर्ण झाली पाहीजे.

यासाठी तुम्ही गावकऱ्यांनी लक्ष दिले पाहीजे. आज हे जे रस्ते मंजूर झाले ते थांबविलेले होते मी विधानसभेत आवाज उठवल्यामुळे मंत्र्यांनी ते मंजूर केले. काही मात्र ते थांबविन्यासाठी प्रयत्न करत होते. आपन जे करतो ते चागलेच करतो आपला हेतु प्रामाणिक आहे. त्यामुळे जनतेने नेहमी विकासकामे करणाऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी आ. आ. डॉ. तांबे म्हणाले की, देशाला मिळालेली लोकशाही ही कांग्रेस पक्षाची देन आहे. ती लोकशाही टिकली पाहीजे. काही लोक धार्मीक व जातीय द्वेष पसरवून सत्ता हस्तगत करत आहेत. धर्माधर्मात तेढ निर्माण करून राजकारण करत आहे. यातुनच मनिपुर सारख्या मानुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहे. ना. थोरात साहेबाच्या माध्यमातून तालुक्यात रस्ते, निळवंडेचे पाट व विविध विकास कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे व पुढेही सुरुच राहतील. रोज एका राज्यात फोडाफोडी करून भाजपचे सरकार सत्ता हस्तगत करत आहे. हे राजकारण सामान्य जनतेला मान्य नाही.

आ. थोरात शेतकऱ्याचे विविध प्रश्न विधानसभेत खुप प्रभावीपणे मांडत आहे. संगमनेर तालुक्याइतका विकास हा राज्यातील कोणत्याच तालुक्यात नाही. आपले कर्तव्य आहे की आपन विकास कामे करना-याच्या पाठीशी उभे राहीली पाहीजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी आर. एम. कातोरे, सरपंच ज्योती कडलग आदीनी मनोगत व्यक्त केले.

दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश कडलग यांनी केले. यावेळी परिसरातील नागरीक व महिला व विविध संस्थाचे पदाधीकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !