◻️ बचत गटांना स्टॉल, पिठाची गिरणी, पॅकींग मशीन, वजन काटा या विविध साहित्याचे वितरण
संगमनेर LIVE (लोणी) | महीलांनी बचत गटातून स्वयंरोजगार निर्मीती करावी. उद्योगातून महीलांना सक्षम करण्यासाठी जनसेवा फौडेशन कायम आपल्या सोबत आहे असे प्रतिपादन रणरागिणी महीला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. धनश्रीताई विखे पाटील यांनी केले.
महीला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा नियोजन समिती, अ. नगर आणि जनसेवा फौडेशन, लोणी यांच्यावतीने राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक, लोणी खुर्द, कोल्हार भगवतीपूर, बाभळेश्वर, लोहगांव, तिसगांववाडी, प्रवरानगर येथील २१ गटांना महसूल मंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महीला बचत गटासाठी वेगवेळ्या माध्यमातून रोजगार निर्मीतीसाठी प्रयत्न सुरू असतात. असे सौ धनश्रीताई विखे पाटील यांनी सांगितले.
महीलांना रोजगार निर्मीतीसाठी वेळोवेळी प्रशिक्षणे, विविध बँकाच्या माध्यमातून अर्थिक सहाय्य, पॅकींग, ऑनलाईन मार्केटींगसाठी मदत केली जाते. गटातून महीलांनी सक्षम व्हावे यासाठी जनसेवा फौडेशन कायम आपल्या सोबत आहे असेही सौ. विखे पाटील म्हणाल्या.
यावेळी उपस्थित महीलांना सौ. विखे पाटील यांच्या हस्ते स्वयंरोजगार केंद्र स्टॉल, पिठाची गिरणी, पॅकींग मशीन वजन काटा यांचे वितरण करण्यात आले. यावेळी महीलांशी मुक्त संवाद साधत त्याच्या अडचणीही त्यांनी जाणून घेतल्या. कार्यक्रमास महीला गटासह गावोगावचे विविध संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
“मी कोल्हार भगवतीपूर येथे देवीच्या मंदीर प्रांगणात पुजा साहीत्य विक्री करते. अनेक दिवसापासून इच्छा असतांनाही स्टॉल उभारू शकले नाही परंतु पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा स्टॉल दिल्याने आपले स्वप्न पूर्ण झाले असून यामुळे व्यवसायाला मोठी चालना मिळले. अशी भावना लाभार्थी सौ. रुपाली नरेश तांदळे यांनी बोलून दाखवली.