◻️ प्रवरेच्या कृषी महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यानी साधला सुसंवाद
संगमनेर LIVE (लोणी) | कृषी शिक्षण झाल्यानंतर पदुत्तर पदवी आणि बँकिंग क्षेत्रात नोकरीसाठी असलेल्या विविध संधीबद्दल विद्यार्थ्याना माहीत व्हावी या हेतूने लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालयामध्ये नुकताच माजी विद्यार्थी सुसंवाद आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. शुभांगी साळोखे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते. यामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे शिक्षण घेत असलेले आकाश गलांडे आणि एचडीएफसी बँकेत असलेले विठ्ठल मरकड यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासाची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. तसेच आपल्या पदुत्तर पदवी आणि बँकिगच्या करिअर बद्दल असलेली अनुभवांची शिदोरी उलगडली.
दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी समन्वयक प्रा. अमोल खडके यांनी केले होते.