घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातून कॉपरचे पाईप चोरणारी टोळी जेरबंद

संगमनेर Live
0
घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातून कॉपरचे पाईप चोरणारी टोळी जेरबंद

◻️ स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई

◻️ ७ लाख २५ हजार ६२५ किंमतीचा मुद्देमाल हस्तगत 

संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथिल ट्रॉमा केअर सेंटर येथील सेंट्रलाईज ऑक्सीजन पाईप लाईन व टर्मीनल हे अज्ञात चोरट्यांनी तोडत एकुण १२ १२ लाख ६१ हजार २९ रुपये किंमतीचे कॉपर पाईप, आऊटलेट व टर्मीनल असा मुद्देमाल चोरुन नेला होता. या घटने बाबत संगमनेर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं ७४६/२०२३ भा.द.वि कलम ४५४, ४५७, ३८०, ४२७ प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यामुळे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना या चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करुन गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित दिले होते.

सुचना मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई तुषार धाकराव, पोहेकॉ दत्तात्रय गव्हाणे, पोना सचिन अडबल, पोना रविंद्र कर्डीले, मपोना भाग्यश्री भिटे, पोना फुरकान शेख, पोना मेघराज कोल्हे, पोना प्रशांत राठोड, पोना व्यवहारे, पोकों आकाश काळे, पोकों अमृत आढाव अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन आरोपींचा शोध घेणे सुरू होते.

यावेळी पथक रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार संदीप उर्फ जब्या संजय वाल्हेकर (रा. संगमनेर) याने त्याचे साथीदारांसह केला असुन तो त्याचे साथीदारांसह संगमनेर शहरातील केशव तिर्थ मंदीर, गंगामाई घाट येथे येणार आहेत.

त्यामुळे पथकाने त्याठिकाणी जाऊन शोध घेतला असता संदीप उर्फ जब्या वाल्हेकर (वय - २४) निखील उर्फ अजय वाल्हेकर (वय - १९) दोघे रा. वेल्हाळे रोड, संगमनेर) व सागर गायकवाड (वय - १९, घुलेवाडी ता. संगमनेर) त्याचेकडे गुन्ह्या बाबत चौकशी केली असता हा गुन्हा त्यांनी अक्षय तामचोकर, शुभम उर्फ पप्पु गायकवाड, मयुर राखपसरे सर्व रा. घुलेवाडी, संगमनेर यांचे सोबत केला असल्याचे सागितले. तसेच गुन्हयातील चोरुन नेलेले ताब्याचे पाईप हे भंगार खरेदी विक्री करणारी महिला अब्दुल अली खान (रा. इदगाह, मैदानाजवळ, संगमनेर) व अफजल अहमद शेख (रा. विजयनगर, कुरणरोड, संगमनेर) यांना विक्री केल्याचे सांगितले.

यावेळी पोलिसांनी गुन्हयातील मुद्देमाल विकत घेणाऱ्यांना ताब्यात घेऊन विचारपुस करुन एकुण ७ लाख २५ हजार ६२५ किंमतीचे ऑक्सीजन लाईनसाठी वापरले जाणारे कॉपरे पाईपचे २२ एमएम, १२एमएम, ८ एमएम चे तुकडे एकुण १६० किलो वजनाचे व ६५० मिटर असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ताब्यात घेतलेले आरोपी संदीप उर्फ जब्या वाल्हेकर, निखील उर्फ अजय वाल्हेकर, सागर गायकवाड, अफजल अहमद शेख यांना पुढील तपासकामी गुन्हयातील जप्त मुद्देमाला सह संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.

दरम्यान हि कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !