◻️ अहमदनगर भरोसा - निर्भया पथकाचा उपक्रम
संगमनेर (लोणी) | प्रवरा कन्या विद्या मंदिर कॅम्पस येथील गंगुबाई इनडोअर स्टेडियम मध्ये प्रवरा कन्या विद्या मंदिर, प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल व बीसीए होम सायन्स महाविद्यालय लोणी येथील विद्यार्थिनींना अहमदनगर भरोसा - निर्भया पथक पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. पल्लवी देशमुख, सहकारी पोलीस नाईक सौ. विधाटे यांनी स्वसंरक्षणा करिता मुलीं व महिलांसाठी पोलीस विभाग व शासनामार्फत असलेल्या निर्भया पथक, डायल ११२, हेल्पलाइन, कायदा, यांसारख्या विविध सुविधा आणि सायबर सेक्युरिटी आदीची प्रकारची तपशीलवार माहिती दिली.
मुलींशी संवाद साधताना संकट समयी प्रसंगावधान राखून निर्भया पथकाशी संपर्क करणे, आपल्या पालकांच्या कष्टांची जाणीव ठेवली पाहिजे, समाजात वावरताना योग्य अयोग्य गोष्टींचा विचार केला पाहिजे, आपल्या सिक्स्थ सेन्सचा वापर केला पाहिजे, या व इतर अनेक बाबींची समर्पक उदाहरणांसह चर्चा केली. शंका समाधानाच्या तासात मुलींनी देखील अगदी न घाबरता, संकोच न करता आपल्या मनातील शंका त्यांच्यासमोर व्यक्त करून आपल्या शंकांचे निरसन केले व सौ. देशमुख यांनीही अतिशय ओघवत्या शैलीत शंकांना उत्तरे दिली. विद्यार्थिनींचे कौतुक करताना सौ. देशमुख यांनी सांगितले की या मुली प्रचंड उत्साही व बोलक्या आहेत असून मला या कॅम्पसमध्ये भरभरून प्रतिसाद मिळाला.
याप्रसंगी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे यांनीही विद्यार्थ्यांनीना मार्गदर्शन करताना, जीवनात यशस्वी होण्यासाठी शालेय जीवन हाच काळ केवळ महत्त्वाचा असून, कोणत्याही बाह्य गोष्टींकडे आकर्षित न होता आपल्या ध्येयाकडे मार्गक्रमण करण्याचा आहे असे प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी पोलीस विभागाच्या तसेच सौ. देशमुख व त्यांचे सहकारी यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त मानले.
दरम्यान याप्रसंगी प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या प्राचार्या सौ. भारती कुमकर, प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या भारती देशमुख, तसेच संस्थेचे सेक्युरिटी इन्चार्ज नानासाहेब वडीतके व तिन्ही शाखांमधील सर्व स्टाफ व मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.