◻️ पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील तंत्रनिकेतन येथे विद्यार्थी व पालक मेळावा संपन्न
संगमनेर LIVE (लोणी) | शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपले इच्छीत ध्येय साध करण्यासाठी प्रवरा शैक्षणिक संकुल कायम आपल्या सोबत आहे. असा विश्वास देतांनाच विद्यार्थ्यांनी जीवनात मोठं व्हा पण आपल्या आई-वडीलांना विसरू नका प्रवरेत गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतचं आपले करीअर घडविण्यासाठी प्रयत्न होत असल्याने प्रवरेचा विद्यार्थी हा जागतिक पातळीवर पोहचला आहे. असे प्रतिपादन सिंधुताई विखे पाटील रणरागिनी महीला मंडळ अध्यक्षा सौ. धनश्रीताई विखे पाटील यांनी केले.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील तंत्रनिकेतन, लोणी येथे विद्यार्थी-पालक शिक्षण आणि व्यवस्थापन समितीच्या बैठकी मध्ये सौ. विखे पाटील बोलत होत्या. यावेळी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक दत्ता पाटील शिरसाठ, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, संस्थेचे अतांत्रिक विभागाचे संचालक डॉ. प्रदिप दिघे, कृषि संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. शुभांगी साळोखे, तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. राठी, प्रवरा अभियाञिकीचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांसह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सौ. धनश्री विखे पाटील म्हणाल्या, दर्जेदार शिक्षणासोबत विद्यार्थ्याना नोकरी आणि कौशल्य उपलब्ध करून देण्यात प्रवरा अव्वल स्थानावर आहे. विद्यार्थ्यांनी जीवनात खुप मोठे व्हावे. पण आई - वडीलांच्या कष्टाची जाणीव ठेऊन त्याचे स्वप्न पूर्ण करा. आपले भविष्य घडवित असतांना आदर्श नागरीक व्हावा यासाठी आम्ही कायम सोबत आहोतं असे सांगितले.
यावेळी डॉ. शिवानंद हिरेमठ यांनी प्रवरा शैक्षणिक संकुलाची माहीती देतानाच संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दर्जेदार शिक्षणाबरोबरचं नोकरी उपलब्धीसाठी विशेष प्रयत्न करतांना विविध कंपन्या सोबत करार, व्यक्तीमहत्व विकास, कौशल्य आधारित प्रशिक्षणे, प्रक्षेत्र भेटी यांवर दिल्याने यांचा निश्चित फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. यावेळी डॉ. शुभांगी साळोखे यांनी ही मार्गदर्शन केले.
दरम्यान कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. व्ही. आर राठी यांनी महाविद्यालयाचा आढावा घेतांनाच विविध विभाग सेवा - सुविधा यांची माहीती देऊन विद्यार्थ्याचे स्वागत केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवही मान्यवरांनी केला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. रविंद्र काकडे यांनी तर आभार प्रा. व्ही. डी पठाडे यानी मानले.