संगमनेर ही गुणवंतांची भूमी - प्रा. विठ्ठल कांगणे

संगमनेर Live
0
◻️ विविध क्षेत्रात यशस्वी कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा गौरव

◻️ सोशल मीडियाच्या जमानात इतरांचे स्टेटस ठेवण्यापेक्षा स्वतःचे स्टेटस बनवा

संगमनेर LIVE | आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळे संगमनेर तालुका हा विकासाचे मॉडेल ठरला आहे. सततच्या विकास कामांबरोबर झालेल्या शैक्षणिक क्रांतीमुळे संगमनेर तालुक्यातील युवकांनी विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली असून संगमनेर ही गुणवंतांची भूमी असल्याचे गौरवोद्गार परभणीचे युवा व्याख्याते प्रा. विठ्ठल कांगणे यांनी काढले आहे.

संग्राम नागरी सहकारी पतसंस्था व जय हिंद लोक चळवळ यांच्यावतीने तालुक्यातील विविध क्षेत्रात दैतिक प्रमाण कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा गौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी जयहिंद चे संस्थापक मा. आ. डॉ. सुधीर तांबे होते. व्यासपीठावर आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे, सौ. रचनाताई मालपाणी आदींसह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रा. कांगणे म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी या तालुक्यात शिक्षणाचा पाया घातला आणि यातून शैक्षणिक क्रांती होऊन अनेकांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर यश मिळवले.

गुणवंतांची भूमी असलेल्या संगमनेर ने आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासारखे सुसंस्कृत नेतृत्व, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, याचबरोबर नासा, इसरो यामध्ये कामगिरी करणारे संशोधक तसेच एवरेस्ट वीर अशा विविध क्षेत्रात यश मिळवले गुणवंत दिले आहे.

तरुणांनी परिस्थितीचा बाऊ न करता परिस्थितीवर स्वार झाली पाहिजे. सोशल मीडियाच्या जमानात इतरांचे स्टेटस ठेवण्यापेक्षा स्वतःचे स्टेटस बनवा. स्वतःच्या आई बापाला आदर्श माना. कारण प्रत्येक संकटात तेच उपयोगी पडतात.

सध्या सर्वत्र वाढत चाललेल्या घटस्फोटाचे प्रमाणाचे खरे कारण एटीट्यूड असून ही अत्यंत चिंताजनक आहे. मुलींनी नेहमी बापाचा सन्मान होईल असेच वागले पाहिजे. पुढील वर्षी आपल्या गुणवत्तेमुळे आपल्या बापाचा सन्मान होईल अशी प्रत्येकाने ठेवली तर नक्कीच जीवनात यशस्वी व्हाल असा सल्लाही त्यांनी दिला.

मा. आ. डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, संग्राम पतसंस्था व जयहिंदच्या माध्यमातून होणाऱ्या या गुणगौरव सोहळ्यामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळणार आहे. निष्क्रिय लोक हे अनेक कारणे सांगत असतात. मात्र यशस्वी होणारे कारणांवर उत्तर शोधत असतात. तरुणांनी आपल्या जीवनाची व ध्येयाची संकल्पना निश्चित करावी असे आवाहनही त्यांनी केले.

आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, मागील पन्नास वर्षात संगमनेर तालुक्यातील झालेल्या कामामुळे विविध क्षेत्रातील गुणवंत येथे निर्माण झाले आहेत. यावेळी सौ. रचनाताई मालपाणी यांनीही मार्गदर्शन केले.

दरम्यान या कार्यक्रमाची प्रास्ताविक पतसंस्थेचे चेअरमन राणीप्रसाद मुंदडा यांनी केले सूत्रसंचालन दत्तात्रय आरोटे व नामदेव कहांडळ यांनी केले. तर व्हाईस चेअरमन विजय गिरी यांनी आभार मानले. यावेळी विविध अकॅडमी मधील विद्यार्थी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

गुणवंतांचा सत्कार..

यूपीएससी परीक्षेमध्ये यश मिळवल्याबद्दल सुकेवाडी येथील मंगेश खिलारी, पिंपारणे येथील राजश्री देशमुख, कोची येथील स्वप्निल डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला. तर नासा मधील यशस्वी कामगिरीबद्दल खांडगाव येथील श्रद्धा गुंजाळ, चंद्रयान अभियानात सहभाग घेतल्याबद्दल पेमगिरी येथील मयूर शेटे, महाराष्ट्रीयन साडी नेसून एव्हरेस्टवर तिरंगा फडकवणारी सुविधा कडलग आणि सायकलपटू व शिवछत्रपती पुरस्कार विजेती प्रणिता सोमन यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !