◻️ विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध धार्मिक व सामाजिक कार्यात होता सहभाग
◻️ आश्वी खुर्द सह पंचक्रोशीत शोककळा
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील निशिकांत सोन्याबापू बर्डे (वय - २७) या तरुणाचे सोमवारी रात्री अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची घटना घडली असून मंगळवारी या तरुणावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आश्वी खुर्द येथील निशिकांत बर्डे हा तरुण राहाता येथिल बंधन बॅकेत नोकरी करत होता. नेहमीप्रमाणे सोमवारी तो कामावर गेला होता. सायंकाळी अंदाजे ८ ते ९ च्या दरम्यान राहत्याहून दुचाकीवरून घराच्या दिशेने येत होता. यांचकाळात जोरदार पाऊस सुरू असल्याने समोरुन येणाऱ्या वाहणाने निशिकांत बर्डे यांच्या दुचाकीला निर्मळ पिप्रीं - लोणी रस्त्यावर हुलकावणी दिली. त्यामुळे झालेल्या भीषण आपघातात बर्डे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
त्यामुळे या तरुणाला उपचारासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू या तरुणाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. मंगळवारी शवविच्छेदन झाल्यानतंर आश्वी खुर्द येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले असून यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
दरम्यान दिवंगत निशिकांत बर्डे हा तरुण आश्वी खुर्द ग्रामपंचायतीचा विद्यमान सदस्य होता तर त्याचा विविध धार्मिक व सामाजिक कार्यात सहभाग असल्याने त्याचा मोठा मित्र परिवार होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, एक भाऊ, भावजय, दोन बहिणी असा मोठा परिवार असून त्यांच्या अकस्मात व दुर्दैवी मृत्यूमुळे आश्वीसह पंचक्रोशीत शोककळा पसरल्याचे चित्र पहावयास मिळत होते.