◻️ संगमनेर येथे शासन आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन
◻️शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थ्याना प्रमाणपत्राचे वितरण
संगमनेर LIVE | महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी उपक्रम आणि टंचाई आढावा बैठकीचे आयोजन बुधवारी दुपारी २ वा. शारदा लॉन्स येथे करण्यात आले आहे. शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण याप्रसंगी केले जाणार आहे.
राज्य सरकारच्या वतीने सर्व जिल्हा आणि तालुक्यांमध्ये शासन आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. या माध्यमातून राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ नागरीकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. संगमनेर तालुक्यात सामाजिक योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना एकत्रितपणे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत योजनांचे प्रमाणपत्र आणि साहित्यांचे वितरण केले जाणार आहे. या निमित्ताने तालुक्यातील टंचाई परिस्थितीचा आढावाही घेतला जाणार असून, या बैठकीस जिल्हाधिकारी सिध्दराम सालिमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ. आशिष येरेकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ आधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तालुक्यात असलेली पाणी टंचाई, टॅकरचे नियोजन, पिक विम्याचे परिस्थिती निळवंडे कालव्यांची कामे, आनंदाच्या शिध्याचे वितरण अशा सर्वच बाबींचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात येणार आहे. महसूल विभागाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या युवा है दुवा या मोहीमे अंतर्गत महसूल विभागाशी जोडल्या गेल्या महाविद्यालयातील तरुणांशीही मंत्री विखे पाटील आणि सर्व आधिकारी संवाद साधणार आहेत. संगमनेर महाविद्यालयामध्ये या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.