सहकार संपला तर शेतकरी व सामान्य व्यक्ती संपेल - खा. डॉ. सुजय विखे पाटील

संगमनेर Live
0
◻️ मुळा - प्रवरा इलेक्ट्रिक को - ऑप सोसायटीची ५० वी वार्षिक सर्व साधारण सभा संपन्न 

संगमनेर LIVE (श्रीरामपूर) | अहमदनगर जिल्ह्यात सध्या काही मंडळी सहकार संपविण्यासाठी काम करत आहे मात्र यातून सर्व सामान्य व्यक्ती तसेच शेतकरी संपला जातोय ही अत्यंत खेदाची बाब असल्याचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. 

श्रीरामपूर येथे मुळा प्रवरा इलेक्ट्रिक को - ऑप सोसायटी लिमिटेडच्या ५० व्या वार्षिक सर्व साधारण सभेत ते बोलत होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रशासक रावसाहेब खेडकर, कार्यकारी संचालक डी. पी. पाटील हे होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, सध्या कुठलीही सहकारी संस्था जीचा विखे पाटील कुटुंबाशी काही ना काही संबंध आला अशा संस्था बंद कशा पडतील यावर काही मंडळी दिवसरात्र काम करत आहेत. परंतु ते हे विसरत आहे की आमच्या कुटुंबियांनी त्या जिवंत ठेवल्या, त्यामुळे संस्थेशी निगडित कामगार, मजदुर, शेतकरी आणि त्यावर आधारित त्यांचा संसार हा चालला. 

मात्र या लोकांनी आम्हाला विरोध करण्यासाठी या सर्वांच्या संसारावर पाणी फेरले. केवळ विरोधासाठी राजकारण करून सहकारी संस्था ह्या बंद पडण्याचा जो उद्योग काही मंडळी सातत्याने करत आहेत त्यामुळे शेतकरी, कामगार, मजदुर आणि त्यांचे कुटुंबीय हे उघड्यावर येत आहेत. ते जे हे पाप करत आहेत त्याची परतफेड ही त्यांना करावीच लागणार असून हीच जनता त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही.

मुळा प्रवरा इलेक्ट्रिक को- ऑप सोसायटीचे काम अत्यंत चांगले चालविण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र त्यावरही प्रशासक आणले. यामुळे माझे काय नुकसान झाले नाही परंतु ह्या सोसायटीवर आधारित कामगार आणि त्यांच्या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले. सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ट असून न्यायालयात सोसायटीचे मतदान कमी करण्यासाठी अनेकजण पुढे आले.

 मात्र ही सोसायटी व्यवस्थित चालवून शेतकऱ्यांना, कामगारांना न्याय देण्यासाठी एकमेव नामदार राधाकृष्ण विखे पाटील प्रयत्नशील आहेत असे यावेळी त्यांनी सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे ही संस्था पुन्हा कशी उभारेल यासाठी प्रयत्न करत आहोत असे सांगितले. 

या संस्थेसाठी कामगार, शेतकरी यांनीही पुढे येण्याचे आवाहन यावेळी विखे यांनी केले. 

दरम्यान सभेच्या प्रारंभी कार्यकारी संचालक पाटील यांनी प्रास्ताविक करून सभेचे ठराव मांडले यास सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. या सर्वसाधारण सभेस माजी संचालक, सभासद यांची उपस्थिती होती.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !