◻️ महसूलमंत्री विखे पाटील यांची शेतकऱ्यांशी चर्चा
संगमनेर LIVE | निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून आज महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन करून पाणी सोडण्यासाठी महसूल मंत्री विखे पाटील आले होते. यावेळी महसूलमंत्र्यांचे निळवंडे येथे आगमन झाल्यावर शेतकरी व प्रशासनात झालेल्या संघर्षामुळे वातावरण तापले होते.
निळवंडे धरणातून अकोले तालुक्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी उच्चस्तरीय कालव्यांची कामे पूर्ण करावीत यासाठी अनेक दिवस आंदोलने सुरू आहेत.
उच्चस्तरीय कालव्याचे काम अपूर्ण ठेऊन पाणी वाहून नेण्यासाठी महसूलमंत्री विखे पाटील धरणस्थळी आले असताना येथील शेतकऱ्यांनी त्यांना जोरदार विरोध केला.
मोठा पोलीस बंदोबस्त लावून शेतकऱ्यांना १ किलोमीटर दूर अडविण्यात आले होते. शेतकऱ्यांनी तीन ठिकाणचे पोलीस बॅरिकेट्स तोडत प्रतिकार केला.
यावेळी विखे पाटील यांना शेतकऱ्यांशी चर्चा केली. ३० ऑक्टोबर पर्यंत उच्चस्तरीय कालव्याचे काम पूर्ण करून अकोले तालुक्यातील वंचित गावांना पाणी देण्याचे मान्य केले.
दरम्यान यावेळी झालेल्या संघर्षात अनेक शेतकऱ्यांच्या बरोबरच डॉ. अजित नवले जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे.