चिंचपुरच्या सरपंचपदी माजी मंत्री आ. थोरात गटाचे रामनाथ तांबे यांची निवड
◻️ चिंचपूर ग्रामस्थांच्या वतीने रामनाथ सहादू तांबे यांचा सत्कार
◻️ गाव तसेच तालुक्याच्या विकासासाठी सर्वानी एकत्र राहावे
संगमनेर LIVE | काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे मॉडेल ठरलेल्या संगमनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतवर आ. बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व असून तालुक्यात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या चिंचपूर ग्रामपंचायत मध्ये रामनाथ सहादू तांबे यांची नुकतीच सरपंच म्हणून निवड झाली आहे.
चिंचपूर ग्रामस्थांच्या वतीने रामनाथ सहादू तांबे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भास्कर खेमनर, राजेंद्र चकोर, शिवाजी तांबे, रामगोपीनाथ तांबे, यादव वर्पे, मीना थेटे, सोनाली गवारे, सविता अनर्थे, राजू लव्हारे, कैलास अनर्थे, उपसरपंच भगत बर्डे, बाबासाहेब तांबे, सागर तांबे, विलास तांबे, ज्ञानदेव अनर्थे, भागवत गुंजाळ, लक्ष्मण तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजेंद्र चकोर म्हणाले की, आ. बाळासाहेब थोरात यांच्या आदर्श नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात कायम सर्वाना बरोबर घेऊन विकासाचे राजकारण केले जात आहे. सर्व ग्रामपंचायत मध्ये झालेला विजय हा कार्यकर्त्यांच्या एकीचा व विकास कामांचा आहे. या निवडणुकीत बाह्य शक्तींनी मोठ्या दबावाचा व इतर गोष्टींचा खूप वापर केला. मात्र जनतेने त्यांना थारा दिला नाही. यापुढेही सर्वानी गावच्या व तालुक्याच्या विकासासाठी एकत्र राहावे असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान रामनाथ तांबे यांची सरपंच पदी निवड झाल्याबद्दल माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, मा. आ. डॉ. सुधीर तांबे, आ. सत्यजित तांबे, इंद्रजीत थोरात, रणजितसिंह देशमुख आदीनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.