अनुसूचित जमातीच्या मुलांसाठी मोफत पोलिस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन

संगमनेर Live
0
◻️ २५ नोव्हेंबर पर्यंत प्रशिक्षण केंद्रात ऑफलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन 

◻️ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर, या कार्यालयांतर्गत पोलिस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण

संगमनेर LlVE (अहमदनगर) | प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर, या कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या पोलिस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र मवेशी, ता. अकोले, जि. अहमदनगर येथे अहमदनगर जिल्हयातील अनुसूचित जमातीच्या मुलांसाठी ४ महिने कालावीधचे पोलिस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षणाचे निवासी व भोजन व्यवस्थेसह मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. 

इच्छुक उमेदवारांनी २५ नोव्हेंबर, २०२३ पर्यंत प्रशिक्षण केंद्रात ऑफलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

दि. १ डिसेंबर २०२३ ते दिनांक ३१ मार्च २०२४ या कालावधीत आयोजित प्रशिक्षणात अहमदनगर जिल्हयातील अनुसूचित जमातीच्या मुलांनाच सहभागी होता येणार आहे. प्रशिक्षणासाठी इयत्ता १२ वी उत्तीर्ण गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, आधार कार्ड, रहिवाशी दाखला किंवा रेशन कार्ड, डोमीसाईल दाखला, चार पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आवश्यक आहेत. 

प्रशिक्षणसाठी उमेदवाराचे वजन किमान ५० कि.ग्रॅ. असावे तसेच वय  १८ ते २५ वर्ष व उंची कमीत कमी १६५ सें.मी. असावी. शारीरिक क्षमता चाचणी ८०० मिटर रनींग (मार्क - ५०), लेखी परीक्षा (मार्क - ५०) एकूण १०० गुणांची परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांची निवड मेरीटनुसार करण्यात येईल.

दिनांक १ ते २५ नोव्हेंबर, २०२३ पर्यंतच उमेदवारांचे ऑफलाईन अर्ज स्विकारले जातील. त्यानंतर अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
 
प्रशिक्षणसाठीचे अर्ज पोलिस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र मवेशी, ता. अकोले, जि. अहमदनगर या ठिकाणी भरता येतील. अर्ज भरलेल्या इच्छुक उमेदवारांनी दिनांक २६ नोव्हेंबर, २०२३ रोजी परीक्षेसाठी पोलिस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र मवेशी, ता. अकोले, जि. अहमदनगर येथे सकाळी ठिक १० वाजता मुळ व झेरॉक्स कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !