आदिवासी नृत्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी धरला ठेका!

संगमनेर Live
0
आदिवासी नृत्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी धरला ठेका!

◻️ संगमनेर येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे ‘घर चलो अभियान’

◻️ अकोले तालुक्यातील नागरिकांना अयोध्या दर्शन घडविण्याची मा. आ. वैभव पिचड यांची ग्वाही 

संगमनेर LIVE (भाऊसाहेब वाकचौरे) | आदिवासी समाजाची संस्कृती व कलेचे दर्शन असणारे आदिवासी कांबड नृत्यात सहभागी होण्याचा मोह भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना आवरला नाही. त्यातील ढोल वाजवत आदिवासी नृत्यावर ठेका धरला.

संगमनेर येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे घर चलो अभियानाचे निम्मताने आले होते. या अभियानात भाजपा अनुसूचित जन जाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री माजी आमदार वैभवराव पिचड यांनी  आयोजन केले होते. नृत्याने संगमनेर करांचे लक्ष वेधून घेतले. प्रदेशाध्यक्ष  बावनकुळे यांनी या नृत्यात सामील झाले. यात ढोल वाजवण्याचा मोह आवरला नाही. या आदिवासी तरुणाकडून याविषयी माहिती जाणून घेतली. राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आदिवासी समाजाच्या नृत्यात सहभागी होऊन ठेका धरतो याचे सर्वांना आश्चर्य वाटले. यावेळी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, शिर्डी लोकसभा संयोजक राजेंद्र गोंदकर, सचिन तांबे, वैभव लांडगे, श्रीराम गणपुले हेही सहभागी झाले.

२२ जानेवारी २०२४ मध्ये अयोध्या येथे श्रीराम प्रभू चे मूर्तीची प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम होणार असून यासाठी अकोले तालुक्यातून किती नागरिकांना अयोध्या दर्शन घडविणार असे वैभवराव पिचड यांना समारोप सभेत विचारले असता ५ हजार पेक्षा जास्त राम भक्तांना अयोध्या नेणार असल्याचे भाजप माजी आमदार वैभवराव पिचड यांनी सांगितले.

कोपरगाव, संगमनेर व अकोले तालुक्यातील सुपर वारियर्स यांच्यासाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. या सुपर वारियर्स च्या बैठकीसाठी माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली सर्वात जास्त संख्येने सुपर वारियर्स व कार्यकर्ते उपस्थित होते. त्याचे ही कौतुक प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केले. भाजपा सुपर वारीयरर्स च्या बैठकीत माजी आ. वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली अकोले तालुक्याची छाप दिसून आली. त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

दरम्यान या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सरचिटणीस सिताराम भांगरे, अकोले तालुकाध्यक्ष यशवंतराव आभाळे, भाऊसाहेब वाकचौरे, तालुका सरचिटणीस राहुल देशमूख, मच्छिंद्र मंडलिक, सचिन जोशी, कार्यालयीन सचिव अशोक आवारी आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !