◻️ सिताराम शेळके आणि बापुसाहेब शेळके यांच्याकडून स्पर्धा परीक्षा पुस्तक संचाची ग्रंथतुला
◻️ आडगाव बुद्रूक येथे दिपावली सणानिमित्त साखर वाटप
संगमनेर LlVE (लोणी) | आडगाव बुद्रूक येथे खा. डॉ सुजय विखे पाटील यांची ग्रंथतुला करून कृतज्ञता व्यक्त केली. निमित होते दिपावली सणाच्या साखर वाटप कार्यक्रमाचे!
या कार्यकर्माचे औचित्य साधून गावातील सिताराम शेळके आणि बापुसाहेब शेळके यांनी स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचा संच एकत्रित करून निळवंडे कालव्यांना आलेले पाणी तसेच भक्तीपीठ ते शक्तीपीठ या उपक्रमातून महीलांना घडवलेली तिर्थयात्रा याची कृतज्ञता म्हणून ही ग्रंथतुला करण्यात आली. सदर पुस्तके गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.
विशेष म्हणजे या ग्रंथतुले मध्ये विद्यार्थ्याना लागणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचा समावेश होता. या उपक्रमाबद्दल खा. विखे पाटील यांनी आभार व्यक्त करतानाच आशा सामाजिक बांधिलकीने विखे पाटील परीवार समाजासाठी काम करीत आहे. समाजातील सर्व घटकांच्या सुख दुखात सहभागी होण्याचा प्रयत्न सातत्याने करीत असलयाचे त्यांनी सांगितले.
निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी यावे यासाठी मंत्री विखे पाटील यांचे सातत्याने प्रयत्न होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे मोठे सहकार्य यासाठी मिळाले. आज दुष्काळी भागाला पाणी मिळू शकल्याने या भागातील शेती व्यवसायाला स्थैर्य मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खा. विखे पाटील यांच्या उपस्थितीत आज राहाता तालुक्यातील पिंपळवाडी, एकरूखे याठिकाणी साखर वितरण करण्यात आले. सर्व गावात त्यांनी जेष्ठ नागरीक, महीला आणि युवकांशी संवाद साधला. मतदार संघात ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास प्रक्रीयेची माहीती देताना शिर्डी येथे विकसित होणाऱ्या औद्योगिक वसाहतीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.