ग्रामपंचायतीत दाखल्यासाठी जाण्याची चितां मिटली!
◻️ अॅपच्या माध्यमातून विविध दाखले होणार उपलब्ध
◻️ ऑनलाईन सेवेमुळे पारदर्शकतेसह वेळ व पैशाची होणार बचत
◻️ कोणते दाखले मिळणार ; अॅप विषयीची माहिती जाणून घ्या..
संगमनेर LIVE | शासनाने महा ई सिटीझन अॅप कार्यान्वित केले आहे. त्यामुळे नागरीकांना आता ग्रामपंचायत कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज पडणार नाही. घरी बसून ऑनलाईन मोबाईल वर विविध दाखले काढता येणार आहेत. यामुळे प्रशासनातील पारदर्शकतेसह नागरीकांच्या वेळ व पैशाची बचत होणार आहे.
नागरिकांना विविध दाखल्यासाठी नियमितपणे ग्रामपंचायत कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असतात. त्यांना हवे असलेले प्रमाणपत्र अथवा शासकीय दाखला वेळेवर उपलब्ध होईल यांची खात्री नसते. कारण काही वेळेस ग्रामपंचायत बंद असते, तर काही वेळेस ग्रामसेवक किंवा कर्मचारी हजर नसतात.
त्यामुळे नागरीकांना हेलपाटे मारत मनस्ताप सहन करावा लागत असतो. नागरीकाची ही अडचण लक्षात घेऊन शासनाने महा ई ग्राम सिटीझन सिटीझन अॅप सुरू केले आहे. यावेळी घरबसल्या नागरीकांना प्रमाणपत्र अथवा दाखला काढता येणार आहे.
कोणते दाखले मिळणार..
जन्म मृत्यूचा दाखला, विवाह दाखला, दारिद्रय रेषेखालील दाखला, असेसमेंट उतारा, कर भरणा (घरपट्टी, पाणीपट्टी) हे दाखले अॅपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत.
अॅप विषयी माहिती..
प्ले स्टोअर वर जाऊन महा ई ग्राम सिटीजन कनेक्ट हे अॅप डाऊनलोड करावे. त्यानंतर ओपन करत नाव, लिंग, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी आदि माहिती भरून नोंदणी करावी. यानंतर युझरनेम व पासवर्ड प्राप्त होणार आहे.