विकास कामाच्या माध्यमातून नागरिकांशी बांधिलकी कायम - सौ. शालिनीताई विखे पाटील
संगमनेर LIVE (राहाता) | राजकीय क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रात चौथी विखे पाटील कुटुंबातील पिढी काम करत असताना, सत्ता असो किंवा नसो नागरिकांशी बांधिलकी कायम राहिली आहे. सरकार मध्ये असताना जे - जे खाते मिळाले त्याचे सोने करून कायापालट करून, विकास कामाचा डोगर उभा करताना गट - तटाचे राजकारण केले नसल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
राहाता तालुक्यातील चितळी येथील राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत पाणी साठवण तलाव व पाण्याची टाकी सुमारे दोन कोटी रुपये पाणी पुरवठा योजनेचे व सव्वापाच कोटी रुपये विविध विकास कामाचे भूमिपूजन व उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब वाघ होते.
यावेळी बोलताना सौ. विखे पाटील म्हणाल्या की, विखे पाटील कुटुंबाने नेहमी विकास हाच ध्यास घेऊन काम केले. येथील शेतकरी वर्गाचा असलेला जिव्हाळ्याचा निळवंडे व गोदावरी कालव्याच्या व पोटचाऱ्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले असून, उर्वरीत विकास कामांना तळ्याच्या वाल कंपाउंड साठी निधी निश्चित उपलब्ध करण्याची ग्वाही दिली.
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य अॅड. अशोकराव वाघ यांनी मनोगत व्यक्त करून, निळवंडे धरणाच्या पोटचाऱ्याचा कामे प्राधान्याने करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी केली.
कार्यक्रमास यावेळी जिल्हा परिषद च्या माजी सदस्य कविता लहारे, पंचायत समितीच्या सदस्य अर्चना लहारे, माजी उपसभापती अलकाताई वाघ, उपसरपंच कविता पगारे, अॅड. अशोकराव वाघ, खा. सुजय विखे पाटील मंच चे अध्यक्ष शैलेश वाघ आदीसह प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्तविक विष्णू वाघ यांनी केले. सूत्रसंचालन सेवा सोसायटीचे संचालक रेवनाथ वाघ यांनी तर आभार शैलेश वाघ यांनी मानले.