धांदरफळ येथे डीजेने घेतला दोघांचा बळी ; सहा जण झालेत जखमी
◻️ झालेली घटना दुर्दैवी- आ. बाळासाहेब थोरात
◻️ दुर्घटनाग्रस्तांना आ. थोरात यांच्या कार्यालयाकडून तातडीची मदत
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे गावामध्ये नवरदेव मिरवणूक सुरू असताना डीजे वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या दुर्घटनाग्रस्तांना वैद्यकीय मदतीसाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेवरून त्यांच्या यंत्रणेने तातडीची मदत केली आहे.
याबाबत माहिती अशी की धांदरफळ खुर्द येथे नवरदेवाची मिरवणूक सुरू होती सर्व वऱ्हाडी मंडळी व गावकरी नवरदेवाला वाट लावून देण्यासाठी एकत्र जमले होते. यावेळी डीजेच्या वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने डीजे त्या मिरवणुकीत घुसला व यामध्ये गावातील खताळ कुटुंबीयांमधील दोघांचा मृत्यू झाला. तर इतर सहा जण जखमी आहे. या गावातील पदाधिकारी दत्ता कोकणे व शरद कोकणे यांनी तातडीने याबाबतची माहिती काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांना दिली.
आमदार थोरात हे पक्षाच्या कामानिमित्त दिल्लीत असून त्यांनी तातडीने आपल्या यंत्रणेला या सर्व दुर्घटनाग्रस्तांना मदत करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पश्चिम भागातीलसर्व पदाधिकारी गावातील कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन दुर्घटनाग्रस्तांना तातडीने संगमनेर येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले.
यानंतर या जखमींची माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी आ. डॉ सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, डॉ. जयश्रीताई थोरात यांनीही आस्थेवाईकपणे चौकशी केली. याचबरोबर यशोधन कार्यालयाकडून सर्व वैद्यकीय मदतीसाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सर्वतोपरी मदत केली. या घटनेमुळे धांदरफळ खुर्द व पंचक्रोशीत शोकाळा पसरली असून मोठी हळहळ व्यक्त होत आहे
झालेली घटना दुर्दैवी- आमदार थोरात
धांदरफळ खुर्द मध्ये झालेली घटना ही अत्यंत वेदनादायी व दुःखदायक असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.