अमृतवाहिनीतील ‘एमबीए'च्या १२ विद्यार्थ्याना ५.६८ लाखांचे पॅकेज
संगमनेर LIVE | उच्च गुणवत्तेच्या तांत्रिक शिक्षणाबरोबर विद्यार्थ्याच्या सर्वागीण व्यक्तिमत्त्व विकास विकासासाठी अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या या महाविद्यालयात येऊन कॅम्पस इंटरव्यू घेतले जातात. नुकतेच एमबीए मधील १२ विद्यार्थ्याची बजाज फायनान्स या कंपनीत ५.६८ लाखांच्या पॅकेजवर नोकरीसाठी थेट निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश यांनी दिली आहे.
काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय हे देशातील पहिल्या दहा महाविद्यालयांमध्ये गौरविले जात आहे. नॅक कडून ‘ए’ प्लस हा दर्जा या महाविद्यालयाला मिळाला असून अभियांत्रिकी अंतर्गत असणाऱ्या एमबीएच्या २०२३ मधील बॅचच्या ४१ विद्यार्थ्यांना मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कॅम्पस इंटरव्यू मधून थेट नोकरी मिळाली आहे.
संस्थेतील सर्व अत्याधुनिक सुविधा, सुसज्ज लायब्ररी, इंटरनेट सुविधा, उच्च प्रतीचे तांत्रिक शिक्षण, उत्कृष्ट निकाल, विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयी सुविधा निसर्गरम्य परिसर, याचबरोबर व्यक्तिमत्त्व विकासासाठी कला कौशल्य ज्ञान माहिती तंत्रज्ञान यावर होणारे विविध सेमिनार यामधून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास केला जातो.
बजाज फायनान्स कंपनी लिमिटेड या नामांकित कंपनीमध्ये एमबीए मधील बारा विद्यार्थ्यांची ५.६८ लाखांच्या पॅकेजवर थेट निवड झाली आहे.
दरम्यान या निवडीबद्दल या सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आ. डॉ सुधीर तांबे, विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, मॅनेजर प्रा. धुमाळ, प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश, डॉ. प्रा. वृषाली साबळे आदिनी अभिनंदन केले आहे.