शिबलापूर शिवारात दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर जेरबंद

संगमनेर Live
0
शिबलापूर शिवारात दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर जेरबंद

संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील शिबलापूर शिवारात दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असल्याचे चित्र आहे.

शिबलापूर शिवारातील चाळशी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालत शेतकऱ्याच्या पशुधनावर हल्ले केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अर्थिक नुकसान केले होते. याचबरोबर राजरोस बिबट्या नजरेस पडत असल्याने परिसरात राहणाऱ्या नागरीकाबरोबरचं लहान मुलांना देखील घराबाहेर पडणे मुश्कील झाले होते. यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या काजल निलेश मुंढे यांच्या सह ग्रामपंचायत शिबलापूर यांनी देखील या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी वनविभागाकडे केली होती.

त्यामुळे वनविभागाने याठिकाणी पिजंरा लावला असता शुक्रवारी मध्यरात्री शिकारीच्या शोधात असलेला बिबट्या पिजंऱ्यात जेरबंद झाला आहे. सकाळी बिबट्याला या ठिकाणाहून सुरक्षित स्थळी हालवण्यात आले आहे. 

यावेळी वनपाल सुहास उपासनी, वनरक्षक हरिशचंद्र जोजर, वन कर्मचारी डी. सी. चौधरी, सरपंच प्रमोद बोंद्रे, राजेंद्र नांगरे, निलेश मुंढे, विशाल मुन्तोडे, शिवाजी बोंद्रे, प्रदीप दुर्गुडे, अमोल नांगरे, गोरख दुर्गुडे, जालिंदर बोंद्रे, अजिम शेख, राजेंद्र बोंद्रे, दिलावर शेख, सुभाष मुन्तोडे, रमेश मुन्तोडे, संतोष गिते, संदीप म्हस्के, रमेश नागरे, पंढरीनाथ नांगरे, नवनाथ नांगरे सोमनाथ चव्हाण, संजय म्हस्के सागर मुन्तोडे, संदीप मुन्तोडे, किरण मुन्तोडे, प्रवीण नांगरे, ज्ञानदेव नांगरे, महेश नांगरे, संदीप बोंद्रे, संजय नागरे आदि उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !