देशाची लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र या - माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
देशाची लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र या - माजी मंत्री बाळासाहेब थोरात

◻️ विकास कामांना दिलेली स्थगिती कोर्टातून उठवली

◻️ १० कोटींच्या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ

संगमनेर LIVE | अनेक अडचणींवर मात करून निळवंडे धरण पूर्ण केले. यामध्ये ज्यांचे योगदान नाही. ते आता श्रेय घेण्यासाठी पुढे येत आहेत. तालुक्यातील विविध रस्त्यांसह अनेक विकास कामांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठा निधी मिळवला होता. मात्र विद्यमान सरकारने या विकास कामांना स्थगिती दिली होती. ही विकास कामांची स्थगिती हायकोर्टातून उठवली असून आगामी काळात लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र या असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

कुरण येथे संगमनेर कुरण - पारेगाव खुर्द, नान्नज दुमाला या रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी. निसार बशीर शेख, उबेद शेख, लक्ष्मणराव कुटे, बी. आर. चकोर, निसार गुलाब शेख, के. के. थोरात, इफ्तीशाम रियाज शेख, सौ. योगिता सातपुते, नदीम शेख, भास्कर शेरमाळे, शबीर शेख, इजाज लाला शेख, शेख मुश्ताक ईस्माईल, जावेद महम्मद हुसेन, प्रभाकर सोनवणे, शाहानवाज महमद हमीद, अजीज मोहिद्दन, मुदसर मन्सुर सय्यद, तार महम्मद अबास, खलील अबास, रियाज लतीफ आदिंसह कुरण गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, सध्या जाती व धर्माच्या नावावर राजकारण केले जात आहे. लोकशाहीच्या दृष्टीने हे अत्यंत घातक आहे. महाराष्ट्रात झालेला सत्ता बदल हा सामान्य माणसाला आवडलेला नाही. संपूर्ण राज्यातील जनता ही महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कालव्यांना मोठा निधी मिळून कालव्याची कामे पूर्ण केली. उद्घाटनाच्या वेळी ज्यांचे योगदान आहे अशांपैकी कोणीही नव्हते. श्रेय घेण्यासाठी ही मंडळी धडपड करत आहे. मात्र जनतेला खरे माहित आहे. 

याच काळात तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी साधारण ७५० कोटींचा निधी मिळवला. तर रस्त्यांच्या कामासाठी ही मोठा मोठा निधी मिळवला. मात्र विरोधी पक्षातील आमदारांच्या विकास कामांना या विद्यमान सरकारने स्थगिती दिली. आता ही स्थगिती हायकोर्टातून उठवली असून कामे पूर्वत सुरू केली आहे. कठीण काळ असला तरी तो जास्त नाही. आगामी काळात सरकार हे महाविकास आघाडीचेच आहे. 

मात्र जातीयतेतू होत असलेले ध्रुवीकरण हे संविधानाने लोकशाहीसाठी घातक असून सर्वांनी मतभेद विसरून तालुका, राज्य व देश आणि लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र या असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.

यावेळी उबेद शेख म्हणाले की, आमदार थोरात यांच्या माध्यमातून तालुक्यातील रस्त्यांसाठी मोठा निधी मिळवला. कुरण गावावर आमदार थोरात यांनी सातत्याने प्रेम केले असून कुरन ते पारेगाव खुर्द या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. यामुळे दळणवळणाची मोठी सोय होणार आहे.

यावेळी गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेख यांनी केले तर निसार शेख यांनी आभार मानले. हे रस्त्याचे काम सुरू होणार असल्याने कुरण गावांमधील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण

जंगी मिरवणुकी सह कुरण ग्रामस्थांकडून आ. थोरात यांच्या प्रति कृतज्ञता

आमदार बाळासाहेब थोरात यांचे कुरण गावांमध्ये आगमन होतात फटाक्यांची आतिषबाजी व तोफांची सलामी देण्यात आली. गावांमधून जंगी मिरवणूक काढण्यात आली. याचबरोबर निळवंडे चे कालवे पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी दिल्याबद्दल जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांचा सर्व ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !