देशाची वाटचाल ही विश्वगुरुकडे, हा मोठा सन्मान - सौ. शालिनीताई विखे पाटील
◻️ प्रवरा उद्योग समुहात प्रजाकसत्ताक दिनानिमित्त विविध उपक्रम
◻️ ना. विखे पाटील यांना ‘डाॅक्टर ऑफ सायन्स‘ उपाधी मिळाल्याबद्दल प्रवरा उद्योग समुहाच्यावतीने अभिनंदन
संगमनेर LIVE (लोणी) | भारत माता की जय, वंदे मातरमचा जय घोष बरोबरचं देशभक्तीपर गिते, मेरे घर राम आये है चा संदेश देतांनाच महापुरुषाच्या कार्याचे स्मरण करण प्रवरा शैक्षणिक, औद्योगिक, कृषि आणि सहकार संकुलात देशाचा ७५ वा प्रजाकसत्ताक दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरा बँक, जनसेवा कार्यालय पायरेन्ससह प्रवरा उद्योग समुहाच्या वतीने ७५ व्या प्रजाकसत्ताक दिनानिमित्ताने सर्वत्र ध्वजारोहण मान्यवरांनी केले.
प्रवरा उद्योग समुहाच्या वतीने पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेचा माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील, विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे, प्रवरा बँकेचे चेअरमन डॉ. भास्करराव खर्डे, उपाध्यक्ष मच्छिंद्र थेटे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक भाऊसाहेब जऱ्हाड, गणपतराव शिंदे, विखे पाटील कारखान्याचे संचालक संजय आहेर, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे, मेजर पाडुरंग चौधरी, सुभेदार बजरंग सिंग, कृषि संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डाॅ. शुभांगी साळोखे, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते.
प्रारंभी एन. सी. सी, प्रवरेतील सुरक्षा पथक, स्टाऊंड गाईड यांनी मान्यवरांना मानवंदना दिली. यावेळी बोलतांना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील म्हणाल्या, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या सर्वसमावेश कामामुळे देशाची वाटचाल ही विश्वगुरु कडे आहे. सामाजिक क्षेत्राला शाश्वत विकासाचे कवच मिळत असल्याने शहर आणि ग्रामीण भागातील दरी कमी होत आहे. सर्वानी संविधानाचा सन्मान ठेवत देशाला प्रगतीकडे नेण्यासाठी प्रयत्न करावे हा संदेश दिला. विविध शाळा महाविद्यालयांच्या सास्कृतिक कार्यक्रमातून सामाजिक एकात्मता, देशभक्तीचे अनोखे कार्यक्रम सादर करण्यात आले.
दरम्यान या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डाॅ. शांताराम चौधरी यांनी तर आभार प्राचार्य डाॅ. आर. ए. पवार यांनी मानले.
पद्यश्री विठ्ठलराव विखे पाटील, पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील यांच्यानतंर संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनाही महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांच्यावतीने ‘डाॅक्टर ऑफ सायन्स‘ उपाधी मिळाल्याबद्दल प्रवरा उद्योग समुहाच्यावतीने अभिनंदन करण्यात आहे.