जैंन संत उपाध्याय पुज्य श्री प्रवीण ॠषीजी महाराज यांचे गुरुवारी प्रवचन
◻️ संगमनेर येथे “मेरा परीवार मेरी ताकत” या विषयावर प्रवचनाचे आयोजन
संगमनेर LIVE (योगेश रातडीया) | जैन श्रावक संघ संगमनेर याच्यावतीने मालपाणी लाॅन्स संगमनेर येथे गुरुवार दि. २९ फेबुवारी रोजी सकाळी ९ वाजता जैंन संत उपाध्याय पुज्य श्री प्रवीण ॠषीजी महाराज यांचे “मेरा परीवार मेरी ताकत” या विषयावर जाहिर प्रवचनाचे अयोजन करण्यात आले असल्याची माहिती जैन श्रावक संघाच्या वतीने वसंत फिरोदिया यांनी दिली आहे.
जैंन श्रमण संघाचे राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंद ॠषीजी महाराज यांचे शिष्य अरहम विज्जा प्रणेते उपाध्याय पुज्य श्री प्रवीण ॠषीजी महाराज, मधुर गायक तिर्रेथेश ऋषीजी महाराज, जैंन साध्वी मधुर व्याख्याता पुज्य श्री सुनंदाजी महाराज आदी ठाणा ५ , पुज्य श्री किर्तीसुधाजी महाराज आदी चतुर्विध संघाच्या उपस्थित जैंन धर्म स्थान्क सुयोग सोसायटी संगमनेर येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान गुरुवारी सकाळी ९ वाजता जैंन संत उपाध्याय पुज्य श्री प्रवीण ॠषीजी महाराज यांच्या “मेरा परीवार मेरी ताकत” या विषयावर होणाऱ्या जाहीर अमृततुल्य प्रवचनाचा लाभ संगमनेर शहर व तालुक्यातील समाजबांधवांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.