आ. बाळासाहेब थोरात यांच्यामुळेचं निळवंडे धरणासह दोन्ही कालवे पूर्ण - डॉ. सुधीर तांबे

संगमनेर Live
0
आ. बाळासाहेब थोरात यांच्यामुळेचं निळवंडे धरणासह दोन्ही कालवे पूर्ण - डॉ. सुधीर तांबे

◻️ निमगाव खुर्द येथे उजव्या कालव्याचे पाणी पूजन मोठ्या उत्साहात संपन्न

संगमनेर LIVE | आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांमधून साकार झालेल्या निळवंडे धरणाच्या  उजव्या कालव्यातून अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या पाण्याचे पूजन निमगाव खुर्द येथील गावकऱ्यांनी ढोल ताशाच्या गजरात व मोठ्या आनंदात व जल्लोषात केले असून निळवंडे धरण व डावा आणि उजवा कालवा हे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सातत्यपूर्ण कामातून पूर्ण झाले असल्याचे गौरवोद्गार मा. आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काढले आहे.

निमगाव खुर्द येथे उजव्या कालव्यातून आलेल्या पाण्याचे पूजन संगमनेर तालुक्यात प्रथम मा. आमदार डॉ. सुधीर तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, ॲड. माधवराव कानवडे, इंद्रजीत थोरात, रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, संपतराव डोंगरे, रमेश गुंजाळ, विलास कवडे, भास्करराव गोपाळे, मनीष गोपाळे, नानासाहेब कानवडे, दत्तू कोकणे, सरपंच संदीप गोपाळे यांसह परिसरातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या जल पूजन प्रसंगी बोलताना मा. आ डॉ. तांबे म्हणाले की, निळवंडे धरण व कालवे हे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अथक प्रयत्नातून पूर्ण झाले आहे. डाव्या कालव्यातून पाणी दुष्काळी भागात आले आणि जनतेच्या आनंदाला पारावर उरला नाही. या कालव्यानंतर उजवा कालवा लवकरात लवकर होऊन सर्व भागाला पाणी मिळावे याकरता आमदार बाळासाहेब थोरात यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा राहिला आहे. १९९९ मध्ये राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी धरण व कालव्यांच्या कामाला खऱ्या अर्थाने गती  दिली. म्हाळादेवी येथील मोठा जलसेतूसह उजवा कालवा महाविकास आघाडी सरकारच्या काळातच पूर्ण झाला होता फक्त पाणी सोडणे बाकी होते. यातही सरकारने दिरंगाई केली मात्र आज पाणी आल्याने सर्वत्र आनंद उत्सव झाला असून आमदार थोरात हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे जलनायक ठरले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यावेळी ॲड. माधवराव कानवडे, डॉक्टर जयश्रीताई थोरात, रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले

याप्रसंगी मीनानाथ शेळके, बाजीराव कवडे, बाळासाहेब गोपाळे, एकनाथ गोपाळे, प्रभाकर गोपाळे, किरण कानवडे, शिरीष गोपाळे, राजेश गोपाळे, नवनाथ कातोरे, सौ. लता खताळ, सोमनाथ कानवडे, राहुल चंद्रमोरे, अरुण गुंजाळ, बाळासाहेब कानवडे, उन्नती महिला ग्राम संघ निमगाव खुर्दच्या अनेक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच संदीप गोपाळे यांनी केले. सूत्रसंचालन बाळकृष्ण गांडाळ यांनी केले तर मनीष गोपाळे यांनी आभार मानले.

पारंपारिक वाद्याच्या गजरात पाण्याचे जल्लोषमय वातावरणात पूजन..

निळवंडे च्या उजव्या कालव्यातून  संगमनेर तालुक्याच्या हद्दीत पाणी आल्यानंतर निमगाव खुर्द सह विविध गावातील महिलांनी या पाण्याची औक्षण केले. यावेळी ढोल ताशांचा व पारंपारिक वाद्यांचा गजर व आनंदोत्सवात सर्वांनी मोठा जल्लोष केला तर पेढे वाटून उपस्थित त्यांनी आपला आनंद साजरा केला.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !