विदर्भ आणि नाशिक परिसरात अवकाळीमुळे प्रचंड नुकसान
◻️ सरकारने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी
◻️ विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी
संगमनेर LIVE (मुंबई) | विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सरकारने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना मदत द्यावी. तसेच धान उत्पादक शेतकऱ्यांना यापूर्वी मदत जाहीर करून देखील अद्याप त्याचा लाभ मिळाला नाही. ही मदतही तात्काळ द्यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.
चंद्रपूर, नाशिक, वर्धा, अकोला, यवतमाळ येथे अवकाळी पाऊस, गारपीठ मोठ्या प्रमाणात झाली आहे. द्राक्ष, संत्रा बाग, डाळिंब, गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना यापूर्वी जाहीर केलेली मदत अजूही देण्यात आली नाही. ही मदत देऊन सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी वडेट्टीवार केली.
दरम्यान यानंतर सरकारकडून सकारात्मक उत्तर देण्यात आले.