आशा सेविकाचे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते प्रांतकार्यालया पर्यंत घंटानाद आंदोलन
◻️ संगमनेर येथे आशा सेविका आणि गटप्रवर्तक महिलांच्या वतीने पाच दिवसांपासून चूलबंद आंदोलन सुरू
◻️ आशा सेविकाना ७ हजार तर गटप्रवर्तक महिलाना १० हजार रुपये मानधनाची मागणी
संगमनेर LIVE | गुरुवारी संगमनेर तालुक्यातील आशा सेविका आणि गटप्रवर्तक महिला यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते प्रांत कार्यालय संगमनेर या ठिकाणापर्यंत विविध मागण्यांबाबत घंटानाद आंदोलन करण्यात आले.
आरोग्यमंत्र्यानी आशा सेविका यांना दरमहा ७ हजार रुपये तर गटप्रवर्तक महिला यांना १० हजार रुपये मानधन मिळावे ही मागणी तोडी स्वरूपात मान्य केली होती. मात्र आशा सेविकाना आंदोलन दरम्यान दिलेला हा शब्द न पाळल्यामुळ आझाद मैदान मुंबई येथे मागील पंधरा दिवसापासून उपोषण सुरु आहे. तसेच मागील पाच दिवस पासून संगमनेर येथील प्रांत कार्यालयासमोर आशा सेविका आणि गटप्रवर्तक महिलांच्या वतीने चूलबंद आणि घंटानात आंदोलन सुरू आहे.
या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी, माजी तालुका प्रमुख भाऊसाहेब हासे, तालुका प्रमुख संजय फड, अमित चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे मोकळ, ओहरा, दीपक साळुंखे, समाजसेवक सचिन साळुंखे यांनी देखील सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी आशा सेविका आणि गटप्रवर्तक महिला यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला.
यावेळी आंदोलना दरम्यान आशा सेविका आणि गटप्रवर्तक महिलांनी घंटानाद आंदोलन करीत सर्वांचे लक्ष वेधले. यादरम्यान प्रांताधिकारी कार्यालयातील अधिकारी यांनी निवेदन स्वीकारले असून लेखी स्वरूपात आपली मागणी जिल्हाधिकारी कार्यालयास कळविल्याबाबतचे पत्र देखील आशा सेविकांना दिले आहे.