अलोट गर्दीसह विविध उपक्रमांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस साजरा
◻️ राज्यभरातून दिग्गज मान्यवरांची मांदियाळी
◻️ सोशल मीडियावरही बाळासाहेब थोरात यांचीचं धूम
संगमनेर LIVE | महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री व कॉग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये राज्यभरातून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संगमनेर मध्ये येऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पाच दिवस सातत्याने विविध उपक्रम, गावोगावी झालेला आनंद सोहळा यामुळे लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा अभिष्टचिंतन सोहळा संस्मरणीय ठरला आहे.
१९८५ पासून संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे विक्रमी मताधिक्याने प्रतिनिधित्व करताना बाळासाहेब थोरात यांनी राज्य मंत्रिमंडळात महसूल, शालेय शिक्षण, कृषी यांसह विविध आठ खात्याचा पादभार सांभाळला. तसेच काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, प्रदेशाध्यक्ष पद आणि राष्ट्रीय पातळीवरील वर्किंग कमिटीचे सदस्य म्हणूनही काम पाहिले. राज्यभरात साहित्य, कला, क्रीडा, शिक्षण, सहकार, समाजकारण अशा विविध क्षेत्रात त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे. पक्षविरहित अनेक माणसे जोडली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील १८२ दुष्काळी गावांकरता निळवंडे धरण व डावा आणि उजवा कालवा पूर्ण करून जनतेला पाणी दिले आहे. यामुळे संगमनेर तालुक्याने त्यांचा वाढदिवस हा आनंद सोहळा भरून मोठ्या दिमाखदार पद्धतीने साजरा केला. यामध्ये लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात मित्र मंडळाने चार दिवस जाणता राजा मैदानावर शिवपुत्र संभाजी हे महानाट्य आयोजित केले. या महानाट्याचा तालुक्यातील सुमारे अडीच लाख लोकांनी लाभ घेतला. याचबरोबर उजव्या कालव्यातून संगमनेर तालुक्यात आलेल्या पाण्याचे गावोगावी मोठे जंगी स्वागत करून जल पूजन करण्यात आले. विविध शाळा, महाविद्यालय, गावांमध्ये वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. तर पठार भागामध्ये बैलगाडा शर्यत आणि नामदार चषक क्रिकेट स्पर्धेचे ही आयोजन करण्यात आले. मतिमंद व मूकबधिर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, याचबरोबर पुस्तक तुला, पुस्तक वाटप हे कार्यक्रम ही मोठ्या उत्साहाने झाले. एसएमबीटी सेवाभावी हॉस्पिटल धामणगाव येथे हृदयावर छिद्र असलेल्या चिमुकल्यांसमवेत आपला वाढदिवस सकाळी साजरा केला.
वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमात पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकर, आमदार लहू कानडे, विवेक कोल्हे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत सौ. कांचनताई थोरात यांनी केलेले भाषण महाराष्ट्रात लोकप्रिय ठरले. नागपूर,विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, सह गुजरात, हिमाचल प्रदेश आणि दिल्ली मधूनही अनेक पदाधिकारी आमदार थोरात यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
जाणता राजा मैदानावरील अभूतपूर्व आणि अद्वितीय अभिष्टचिंतन सोहळ्यात आमदार निलेश लंके, आमदार किरण लहामटे, राजेश मालपाणी, सत्यशील शेरकर सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवपुत्र संभाजी हे डॉ. अमोल कोल्हे यांचे महानाट्य आणि त्यांनी केलेले आमदार थोरात यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाषण प्रत्येकासाठी संस्मरणीय ठेवा ठरला आहे. या सर्वांचं अत्यंत विनम्रतेने स्वागत सौ. दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, आ. सत्यजित तांबे, इंद्रजीत थोरात या सर्वांनी केले.
नीटनेटके नियोजन, उत्कृष्ट आयोजन प्रत्येकाशी संवाद या सर्व कार्यक्रमासह अमृत उद्योग समूह व नामदार बाळासाहेब थोरात मित्र मंडळाने केलेल्या विविध उपक्रमांचे आयोजन संगमनेरकरांसाठी मोठी पर्वणी ठरली.
सोशल मीडियावरही बाळासाहेब थोरात यांचीचं धूम..
काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात ही अबाल वृद्धांसह तरुणाई मध्ये मोठे लोकप्रिय आहेत. सोशल माध्यमांच्या प्रत्येक ठिकाणी आमदार थोरात यांच्या विविध रील्स, विविध भाषणे, फोटो यांची मोठी धूम होती. प्रत्येकाच्या स्टेटसला आणि डीपीला आमदार थोरात यांचे फोटो होते. महाराष्ट्रभरातील जिल्ह्यातील आणि तालुक्यातील तरुणाई मध्ये आमदार थोरात यांची मोठी लोकप्रियता असल्याने सर्वत्र आमदार थोरात यांची धूम होती.