संभाजी महाराजांच्या तेजस्वीतेपुढे अनाजीपंत निष्प्रभ
◻️ शिवपुत्र संभाजी महानाट्याला दुसऱ्या दिवशीही अभूतपूर्व प्रतिसाद
संगमनेर LIVE | काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त आनंद सोहळ्यात होत असलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्यात शंभुराजे छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या बुद्धीचातुर्य, पराक्रम आणि तेजापुढे कावेबाज अनाजीपंत निष्प्रभ ठरले. तर महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी प्राण्यांची आहुती देणाऱ्या छत्रपती शंभूराजाचा स्फूर्तीदायी इतिहास इतिहास जिवंत झाला.
जाणता राजा मैदानावर खासदार डॉ अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेल्या शिवपुत्र संभाजी हे महानाट्य ५५ ते ६० हजार नागरिकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले. यावेळी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाल शंभूराजांची आग्र्याहून सुटका, शंभूराजांचे रायगडावर झालेले आगमन. यानंतर शंभूराजांचा शाही विवाह, शिवाजी महाराज आजारी असताना कारभाऱ्यांनी केलेला कावा हे पाहताना अंगावर रोमांच उभे राहत होते.
रुबाबदार आश्वावरून संभाजी महाराजांचे आगमन होतात. उपस्थित आणि टाळ्यांचा कडकडाट केला. अत्यंत जोश पूर्ण आवेशात डॉ. अमोल कोल्हे यांनी सादर केलेली संभाजी महाराजांच्या भूमिकेतील प्रत्येक संवाद हा उपस्थितांच्या अंगावर शहारे आणत होता.
यावेळी कावेबाज अनाजी पंतांनी आखलेली खेळी, त्यात अडकलेल्या महाराणी सोयराबाई आणि संभाजी महाराजांना बदनाम करण्याचा कट, यामुळे उपस्थितांमध्ये अनाजी पंतांची भूमिका करणारे महेश कोकाटे यांच्या बद्दल प्रचंड राग निर्माण होत होता.
तर महाराणी येसूबाईची भूमिका साकारत असलेल्या अभिनेत्री स्नेहलता वसईकरणे सर्वांची मने जिंकली समुद्रावरील, जंजिरा मोहीम, मोगली फौजांचे महाराष्ट्रावर आक्रमण, सुमारे तीनशे कलाकारांच्या उपस्थितीत भव्य दिव्य झालेले हे महानाट्य आणि संभाजी राजेंना फितूर ने झालेली अटक आणि त्यांचे झालेले हाल यामुळे प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले.
नामदार बाळासाहेब थोरात मित्र मंडळाच्या वतीने अत्यंत चांगली व्यवस्था सर्व उपस्थित यांची करण्यात आली असून दुसऱ्या दिवसाच्या महानाट्यासाठी साधारण ५५ ते ६० हजार नागरिक उपस्थित होते. यावेळी रस्त्यावर एलडी स्क्रीनही लावण्यात आल्या होत्या. अत्यंत शांतबद्ध व सुसंस्कृतपणे झालेल्या हा महानाट्याचा सोहळा संगमनेर करांसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरत आहे.