◻️ १६ फेब्रुवारी २०२४ रोजी संपूर्ण भारतभर निषेधाची हाक
◻️ एसकेएमने पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात चर्चेची मागणी
◻️ किसान चळवळ लोकशाही अधिकारांवर होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याचा प्रतिकार आणि निषेध करणार
संगमनेर LIVE | शेतकरी संघटनांच्या दिल्ली चलो मार्चला रोखण्यासाठी लाठीचार्ज, रबर बुलेट, अश्रुधुराचे गोळे आणि मोठ्या प्रमाणात अटक करणाऱ्या राज्य शक्तीचा अतिरेकी वापर केल्याबद्दल सयुक्त किसान मोर्चाने मोदी सरकारचा तीव्र निषेध केला आहे. प्रशासनाकडून शेतकऱ्यांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आल्याचे सयूक्त किसान मोर्चाने म्हटले आहे.
एसकेएमच्या त्याच्या सर्व सदस्य संघटनांना आणि भारतभरातील त्यांच्या युनिट्सना १६ फेब्रुवारी २०२४ रोजी पंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या हल्ल्याचा भारतभरातील सर्व खेड्यांमध्ये तीव्र निषेध करण्यासह संपूर्ण भारतभर आणि ग्रामीण भागात व्यापक बंद यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या शांततापूर्ण लढ्यावर हल्ला करण्यासाठी पोलीस आणि सशस्त्र सुरक्षा दलांना उतरवल्याने मोदी सरकारने लोकांचा विश्वास गमावल्याचे दिसून येत असल्याचा आरोप सयुक्त किसान मोर्चाने करत लोकशाही समाजात प्रत्येक नागरिकाला शांततेने आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचे म्हणत लोकांच्या प्रत्येक घटकाचे ज्वलंत प्रश्न सोडवणे आणि त्यांच्या जीवनमानाचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या ठोस मागण्या पूर्ण करणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे देखील म्हटले आहे.
सयुक्त किसान मोर्चाने केंद्र सरकारला इशारा दिला आहे की, ज्या लोकांना त्यांच्या खऱ्या मागण्यांसाठी रस्त्यावर येण्यास भाग पाडले जाते त्यांना सरकार किंवा देशाचे शत्रू समजू नका. शेतकऱ्यांची प्रमुख मागणी भाजप आणि विद्यमान पंतप्रधानांनी २०१४ च्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने होती. १० वर्षे उलटूनही या आश्वासनाची अंमलबजावणी झालेली नाही. एसकेएमने पंतप्रधानांना पत्र लिहून दिल्ली चलो आंदोलन आयोजित करण्यासाठी तत्काळ सैन्य मागे घ्यावे आणि शेतकऱ्यांच्या हक्कांचे रक्षण करावे आणि शेतकरी आणि कामगारांचा संघर्ष चर्चेद्वारे सोडवावा असे आवाहन केले आहे.
दरम्यान सयुक्त किसान मोर्चाने सर्व समविचारी संघटनांना समान मागण्यांवर एकत्रित मुद्द्यावर आधारित लढा उभारण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले असल्याची माहिती किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी दिली.