जोर्वे येथे वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणारा ट्रॅक्टर अपोलीसांनी पकडला
◻️ ट्रॅक्टर नेमका कोणाचा? तालुक्यात जोरदार चर्चा
संगमनेर LIVE | विना परवाना वाळुची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर संगमनेर तालुका पोलिसांनी कारवाई केली असून, ट्रॅक्टर आणि सुमारे दिड ब्रास वाळूसह २ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर ट्रॅक्टर हा नेमका कोणाचा? याबाबत विविध तर्क वितर्क लढवले जात असून राजकीय व्यक्तीशी संबंध असल्याची तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे.
जोर्वे येथील माध्यमीक शाळेच्या कंपाऊट जवळ शुक्रवार १६ फेब्रुवारी रोजी वाळूने भरलेला ट्रॅक्टर पोलिस कॉन्स्टेबल बाबासाहेब केशव शिरसाठ यांना आढळून आला. त्यानुसार ट्रॅक्टर क्रमाक एम. एच. १७ एव्ही ७०६५ या ट्रॅक्टर मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र फिर्यादीमध्ये ट्रॅक्टर मालकाच्या नावाचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही.
तालुका पोलिसांनी सुमारे दिड लाख रुपये किमतीचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर, ५५ हजार रुपये किमतीची विना नंबरची ट्रॅक्टरच्या मागे असलेले डंपींग ट्रॉली आणि ट्रॉलीमध्ये असलेली सुमारे १५ हजार रुपये किमतीची अंदाजे दिड ब्रास वाळू असा एकुण २ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
दरम्यान पोलिस कॉन्स्टेबल बाबासाहेब शिरसाठ यांच्या फिर्यादीवरुन संगमनेर तालुका पोलिसांनी रजिस्ट्रर नंबर ८६/२०२४ नुसार भादवी कलम ३७९ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस निरिक्षक देवीदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.