वाळू माफियावर गुन्हे दाखल होऊ नये यासाठी मंत्रालयातून सूचना - बाळासाहेब थोरात
◻️ सरकारच्या वाळू धोरणावर माजी महसूलमंत्र्याची सडकून टिका
संगमनेर LIVE | वाळू धोरण हे कसे फसले आहे याची कबुली महसूल मंत्र्यांनी सभागृहात दिली. सरकारी आशिर्वादाने वाळू माफियांचा संपूर्ण राज्यामध्ये हैदोस सुरु आहे. अधिकाऱ्यांवर रोज हल्ले होत आहेत. त्या वाळू माफियांवर गुन्हे दाखल करू नये, असे प्रयत्न सरकारकडून आणि मंत्रालयातून केले जात आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची टिका माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानभवनात केली आहे.
ते पुढे म्हणाले की, वाळू धोरण हे कसे फसले आहे, हे सर्व सभागृहाला व जनतेला माहिती आहे. मंत्री महोदय म्हणतात की, आम्ही आता ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेला परवानगी देऊन टाकु.
महसूल मंत्री महोदय यांनी आणावयाच्या नव्या धोरणासंदर्भात पुन्हा एकदा अधिकाऱ्यांसोबत आणि विधी व न्याय लोकांसोबत बसा आणि आपण असे धोरण आणू शकतो का? हे फक्त या अधिवेशनात सांगा. असा प्रश्न सभागृहात बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला आहे.