बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत उद्या दंडकारण्य अभियानाचा शुभारंभ
◻️ डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे देखील उपस्थित राहणार असल्याची प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे यांची माहिती
संगमनेर LIVE | थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनासाठी सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानाच्या १९ व्या वर्षाचा शुभारंभ काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत पेमगिरी येथे बुधवार दिनांक १७ जुलै २०२४ रोजी सकाळी ९ वाजता चंदनगड डोंगरावर होणार असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख सौ. दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे.
सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गाचे संवर्धन करणे प्रत्येकाची मुलभूत जबाबदारी बनली असून वृक्षारोपन व पर्यावरणाचे संवर्धन करणे भावी पिढयांसाठी काळाची गरज बनली आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मागील १८ वर्षात तालुक्यातील विविध संस्था, विद्यालये, कार्यकर्ते नागरिकांच्या सहकार्यातून हे अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले.
संगमनेरच्या दंडकारण्य अभियानाची नोंद ही आंतरराष्ट्रीय पातळीवर झाली असून या अंतर्गत संगमनेर तालुक्यात वृक्ष संवर्धन संस्कृती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे अभियानाची १९ वे वर्ष आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पेमगिरी येथील चंदनगड डोंगरावर आमदार बाळासाहेब थोरात, मा. आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीमध्ये या अभियानाच्या शुभारंभ होणार आहे.
यावेळी आमदार सत्यजित तांबे, माधवराव कानवडे, बाबा ओहोळ, रणजितसिंह देशमुख, इंद्रजित थोरात, डॉ. जयश्री थोरात आदिसह कृषी विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहे.
दरम्यान या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन पेमगिरी ग्रामस्थ व दंडकारण्य अभियान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.