केंद्रातील भाजप सरकारचे गर्वहरण महाराष्ट्राने केले - बाळासाहेब थोरात
◻️ चंदनापुरी येथे ५ कोटी २७ लाख रुपये निधीच्या विविध विकास कामांचे लोकार्पण
संगमनेर LIVE | दुष्काळी भागाला नवसंजीवनी देणारे निळवंडे धरण व कालवे आपन पुर्ण केले. तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांसह येथील चांगल्या वातावरणामुळे तालुक्याचा लौकिक निर्माण झाला. त्यामुळे सततच्या विकास कामातून येणाऱ्या विधानसभेतही मोठे यश मिळणार आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून केंद्रातील भाजप सरकारचे महाराष्ट्राने गर्वहरण केले आहे. राज्य सरकारकडून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फसव्या घोषणांना सुरु आहेत. अशा फसव्या घोषणाबाजीला बळी पडू नका असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
चंदनापुरी येथे ५ कोटी २७ लाख रुपये निधीच्या विविध विकास कामांचा लोकार्पण कार्यक्रमात बाळासाहेब थोरात बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी खासदार भाऊसाहेब वाकचौरे होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, बाबासाहेब ओहोळ, रणजीतसिंह देशमुख यांच्यासह स्थानिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकारने स्वायत्त असलेल्या ईडीसीबीआय सारख्या संस्था गुलाम बनवल्या. त्यातून दबावाचे राजकारण सुरू केले. देशात महागाई, बेरोजगारी वाढली असून शेतकरी, कामगार, सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे. मात्र सरकारचे त्याकडे लक्ष नाही. गर्व झालेल्या केंद्रातील भाजप सरकारला रोखण्याचे काम महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने आणि जनतेने केले आहे.
राज्यात आलेले सरकार जनतेला मान्य नाही. त्यांच्यामध्ये ताळमेळ नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळणार आहे.
१९८५ पासून तालुक्यातील जनतेने खूप प्रेम केले. त्यामुळे राज्यात मिळालेल्या मोठ्या संधीचा सर्वसामान्यांच्या विकासासाठी उपयोग केला. निळवंडे धरण कालवे यांच्यासह अनेक कामे मार्गी लावली. सतत काम करत राहणे हे आपले वैशिष्ट्य आहे. राज्यात शरदचंद्र पवार, उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आपल्याला मान मिळतो आहे. हे जनतेचे प्रेम असून आगामी काळामध्ये सर्वांनी एकजुटीने महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.
खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. आ. थोरात हे अत्यंत नम्र स्वभावाचे व सर्वांना स्वातंत्र्य देणारे नेतृत्व आगामी काळामध्ये नाशिक पुणे रेल्वे संगमनेर वरूनच जाण्याकरता आपण दिल्ली दरबारी पाठपुरावा करू असेही ते म्हणाले.
आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात विकासाची गंगा आली आहे. त्यांनी कायम सर्वांना सोबत घेऊन काम केले असल्याने तालुक्याचे कुटुंबप्रमुख म्हणून आपण सर्वजण त्यांचा आदर करतो. मनाचा मोठेपणा असलेले आमदार थोरात हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतील सर्वात पुढचे नाव असून सर्वांनी आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली एकजुटीने काम करावे असे आवाहन केले.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच भाऊराव राहणे यांनी केले. सूत्रसंचालन नंदकिशोर राहणे यांनी तर एस. एम. राहणे यांनी आभार मानले. यावेळी चंदनापुरी सह पंचक्रोशीतील नागरिक महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात व मान्यवरांची भव्य वाजत गाजत मिरवणूक..
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून पाच कोटी सत्तावीस लाख रुपये निधीच्या विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी चंदनापुरी ग्रामस्थांनी आमदार बाळासाहेब थोरात यांची पारंपारिक पद्धतीने भव्य मिरवणूक काढली. यावेळी ढोल ताशांचा गजर ,लेझीम पथक, आणि पारंपारिक वेशभूषेतील युवक याचबरोबर भव्यदिव्य झालेली मिरवणूक ही लक्षवेधी ठरली.