◻️ हिवरगावपावसा येथे बिबट्याच्या हल्ल्यात झाला होता चिमुकलीचा मृत्यू
◻️ ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे अधिकाऱ्यांना सर्वतोपरी मदतीचे निर्देश
◻️ डॉ. विखे पाटील यांच्या बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी सूचना
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील हिवरगावपावसा येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या ओवी सचिन गडाख या कुटूंबीयांची भेट घेवून माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी भेट देवून सांत्वन केले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा करुन बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी अधिक उपाय योजना करण्याचे त्यांनी सुचित केले.
या घटनेनंतर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून गडाख कुटूंबियांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सुचना दिल्या आहेत. याचाच भाग म्हणून या कुटूंबाला शासनाच्यावतीने १० लाख रुपयांची मदत देण्यात आली. उर्वरीत रक्कमही लवकरच देण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली तसेच कुटूंबीयांनाही दिलासा दिला. या सर्व संकट परिस्थितीत विखे पाटील कुटूंबीय आपल्या समवेत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान याप्रसंगी भाजपचे अमोल खताळ, माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, सरपंच सुभाष गडाख, गणेश दवंगे, अशोक कानवडे, तसेच वनविभागाचे उपविभागीय वनाधिकारी संदीप पाटील, आरएफओ लोंढे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.