प्रभु श्रीराम मंदिर जिर्णोद्धाराला निधी कमी पडू देणार नाही - ना. विखे पाटील
◻️ आश्वी खुर्द येथील मंदिरासाठी विखे पाटील यांच्या पाठपुराव्यातून १० लाख रुपये निधी मंजूर
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील ऐतिहासिक व पुरातन अशा प्रभु श्रीराम, श्री दत्त व पुजांआई माता मंदिर जिर्णोद्धार करण्यासाठी २५/१५ अंतर्गत १० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीराम मंदिराला निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही दिली आहे.
शुक्रवारी सकाळी आपल्या नियोजित दौऱ्यानिमित्त विखे पाटील आश्वी खुर्द येथे आले होते. यावेळी ग्रामस्थांनी मंदिर जिर्णोद्धार करण्यासाठी निधी मंजूर केल्याबद्दल विखे पाटील यांचा सत्कार केला. यावेळी ना. विखे पाटील यांनी मंदीर परीसराचे पाहणी करत प्रभु श्रीरामाचे दर्शन घेतले आणि श्रीराम मंदिराला निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही दिली. त्यामुळे ग्रामस्थांनी महसूलमंत्र्याचे आभार मानले.
दरम्यान यावेळी अँड. अनिल भोसले, उपसरपंच बाबा भवर, माजी उपसरपंच संजय गायकवाड, सोपान सोनवणे, संतोष भडकवाड, कैलास गायकवाड, बाबासाहेब भोसले, विकास गायकवाड, मनोज भंडारे, दगडू गायकवाड, माणिक गायकवाड, कैलास दोडके, मोहित गायकवाड, यशवंत वाल्हेकर, संजय भडकवाड, बाळा राक्षे, जमाल शेख, विकास बोरुडे, प्रवीण दातीर आदिसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.