नवदाम्पत्याचे गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह झाडाला लटकलेले आढळले
◻️ संगमनेर तालुक्यात खळबळ ; अवघ्या तीन महिन्यांपूर्वी झाला होता विवाह
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील साकूर परिसरात रविवारी रात्री दुर्दैवी घटना घडली असून अवघ्या काही महिन्यांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या नवविवाहित दाम्पत्याचे मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. त्यामुळे पुढील तपास घारगाव पोलीस करत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, साकूरजवळील महालदरा येथे ही दुर्दैवी घटना घडली. वैभव दत्तात्रय आमले (वय - २३) आणि स्नेहा वैभव आमले (वय - २०) अशी या मयत झालेल्या नवदाम्पत्याची नावे आहेत.
मयत वैभव आणि स्नेहा हे दोघेही पुणे येथे नोकरीला होते. माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, प्रमोद गाडेकर, सुभाष बोडखे आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल होत त्यानी घटनेचा पंचनामा केला आहे. या दोघांनी आत्महत्या का केली? यांचे रहस्य मात्र कायम आहे. तर ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकचं खळबळ उडाली आहे.