कॉग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयावर ‘वंचित’चा मोर्चा
◻️ खासदार राहुल गांधी यांच्या आरक्षण विरोधी वक्तव्यचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी
◻️ संगमनेर येथे मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी केले स्थानबद्ध
संगमनेर LIVE | काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परदेशात आरक्षण विरोधी वक्तव्य केले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या संगमनेर तालुक्यातीला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यानी काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यामुळे पोलीसांनी हा मोर्चा शासकीय विश्रामगृहाजवळ अडवत सर्व मोर्चेकरांना स्थानबद्ध केले.
याआधी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात केली. यावेळी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात मोर्चेकरांनी जोरदार घोषणाबाजी केली.
हा मोर्चा बस स्थानक मार्गे नाशिक रोडने काँग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयवरती जात असताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी हा मोर्चा शासकीय विश्राम गृहाच्या जवळ अडविला.
यावेळी आंदोलनकर्ते अन पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. आम्हाला हा मोर्चा यशोधन कार्यालयावर नेण्याचा आग्रह धरण्यात आला. काही कार्यकर्त्यानी हा मोर्चा पुन्हा सुरू केला मात्र पोलीस प्रशासनाने बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या शिवाजीनगरच्या कोपऱ्यावरती अडवित पुढे नेण्यास मज्जाव केला. त्यामुळे आंदोलनकर्ते अन पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. त्यामुळे मोर्चेकर जास्तच आक्रमक झाले होते. त्या नंतर हा मोर्चा आटोक्यात येत नाही म्हणून सर्व मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले.
लोकसभा निवडणुकीच्या अगोदर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढत भाजप संविधान मोडायला लागले आहे ते संविधान आम्ही वाचवायला आलो आहे अशी साद घालत एसी, एसटी, एनटी, ओबीसी यांची मते घेतली. त्यानंतर विरोधी पक्ष नेते झाल्यानंतर अवघ्या तीनच महिन्यात हेच राहुल गांधी परदेशात जाऊन ही विषमता नष्ट झाल्यावर आम्ही आरक्षण बंद करू असे विरोधी वक्तव्य करतात.
तर आम्ही संविधान बदलणार आम्ही आरक्षण बदलणार असे भाजप उघडपणे सांगत आहे. मात्र काँग्रेस छुप्या पद्धतीने भाजपचाच अजेंडा वापरून आरक्षणाला विरोध करत आहे. त्यांच्या पोटात होतं ते राहुल गांधी यांच्या तोंडातून ते बाहेर पडले आहे. अशी प्रतिक्रिया मोर्चेकरांनी यावेळी दिली.