‘नॅशनल कॅन्सर रोज डे’ निमित्त राज्यपालांचा बाल कर्करुग्णांशी संवाद
संगमनेर LIVE (मुंबई) | ‘नॅशनल कॅन्सर रोज डे’ निमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी रविवारी (दि. २२) बाल कर्करुग्णांशी संवाद साधला तसेच त्यांना गुलाबाचे फुल व भेटवस्तू दिल्या.
राज्यपालांच्या सूचनेनुसार लहान मुलांना राजभवनाची सैर करविण्यात आली. भेटीचे आयोजन कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA) या संस्थेने केले होते.
यावेळी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष वाय. के. सप्रू, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अलका सप्रू बिसेन व कार्यकारी संचालक निता मोरे आदि उपस्थित होते.