सर्वाच्या योगदानामुळेचं प्रवरा अव्वल स्थानावर - डॉ. सुष्मिता विखे पाटील
◻️ प्रवरा शिक्षण संस्थेच्या चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांनी घेतला नवरात्रोत्सवाचा आनंद
◻️ चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी हे आमचे वैभव ; संस्थेच्या दृष्टीने ते आमच्यासाठी हिरो!
संगमनेर LIVE (लोणी) | प्रवरा परिसर हे कुटुंब असून या कुटुंबातील प्रत्येक घटकाच्या त्यागातूनच संस्था ही उभी राहिली आहे. चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी हे आमचे वैभव आहे. त्यांचे योगदान हे महत्त्वपूर्ण असून संस्थेच्या दृष्टीने ते आमचे हिरो असल्याचे प्रतिपादन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित स्नेह मेळाव्यात त्या बोलत होत्या. ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या १०६ शाळांमध्ये सहकारातून समृद्धीकडे हा संदेश देणारा प्रवरा नवरात्र उत्सव विविध उपक्रमाने संपन्न होत आहे. याच निमित्ताने संस्थेच्या चतुर्थ कर्मचाऱ्यांसाठी आयोजित मेळाव्यात डाॅ. सुष्मिता विखे पाटील बोलत होत्या.
यावेळी संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, संस्थेचे शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक डॉ. उत्तमराव कदम, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे यांच्यासह प्राचार्य आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्ताने त्यांच्यासाठी विविध स्पर्धेचा आयोजन करण्यात आले होते.
डॉ. सुष्मिता विखे पुढे म्हणाल्या की, प्रवरा हे एक कुटुंब आहे आणि या कुटुंबाच्या माध्यमातून प्रत्येक जण आपआपले योगदान प्रत्येक ठिकाणी देत असतो. चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे संस्थेचे खरे हिरो आहेत. प्रत्येक इव्हेंटमध्ये त्यांचा सहभाग हा महत्त्वपूर्ण असतो. त्यांचा सन्मान व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आणि त्यांच्यासाठी संस्थेच्या माध्यमातून एक दिवसाच्या विविध उपक्रमाचा आयोजन हा आगळावेगळा आनंदा असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम प्रत्येक घटकासाठी सुरू आहेत. आपल्या संस्थेत कार्यरत असणारा प्रत्येक कर्मचारी हा संस्थेचा मुख्य घटक आहे. यामुळेच आज सर्व संस्था प्रगतीपथावर आणि नाविन्यपूर्ण काम करत आहेत याचा मोठा आनंद असल्याचे त्या शेवटी म्हणाल्या.
दरम्यान याप्रसंगी अनेक चतुर्थ कर्मचाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करून या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ देखील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. लीलावती सरोदे यांनी केले.
मी आज सक्षम उभी आहे. हे केवळ प्रवरेमुळे आज आमच्यासाठी प्रवरा हे कुंटुंब झाले आहे. आमचा झालेला सन्मान हा खुप आनंद देणारा असल्याची भावना उपस्थित महिलांनी बोलुन दाखवली.