अजय - अतुल यांच्या गाण्यांवर डॉ. सुजय विखे यांचा पत्नीसह ठेका

संगमनेर Live
0
अजय - अतुल यांच्या गाण्यांवर डॉ. सुजय विखे यांचा पत्नीसह ठेका

◻️ जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित सांस्कृतिक महोत्सवाला जनसागर लोटला

संगमनेर LIVE (शिर्डी) | नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने जनसेवा फाउंडेशनच्या वतीने शिर्डी येथे ‘नारी शक्ती सन्मान सोहळा’ व ‘सांस्कृतिक महोत्सव’ असंख्य महिला भगिनींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा झाला. या शिर्डी महोत्सवाच्या निमित्ताने प्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी वाघ देखील शिर्डीत दाखल होऊन साईबाबांचे त्यांनी मनोभावे दर्शन घेतले आणि कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून समस्त महिला भगिनी आणि नागरिकांचा आनंद द्विगुणित केला.

विशेष म्हणजे या सांस्कृतिक महोत्सवात अजय अतुल या धमाल जोडीने आपल्या गायनाने हजारोच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या माता - भगिनी आणि समस्त नागरिकांना थिरकण्यास भाग पाडले. यावेळी डॉ. सुजय विखे पाटील यांनी देखील झिंगाट गाण्यावर पत्नी धनश्री विखे पाटील यांच्यासोबत ठेका धरला आणि उपस्थित नागरिकांच्या आनंदात अजून भर घातली.  

यावेळी डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील नागरिकांना अजय अतुल यांचे लाईव्ह गाणे ऐकता येणे आणि त्यांना जवळून पाहत त्यांच्या कलेचा सन्मान करता येणे म्हणजे ही पर्वणीच म्हणावी लागेल. मोठ्या शहरांमध्ये हजार दोन हजार रुपये देऊन त्यांचे 'शो'ज होतात. परंतु शिर्डीत सर्वांना मोफत त्याचा आनंद घेता आला आणि यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी अजय अतुल जोडीचे आभार देखील मानले.

अजय अतुल यांच्या गायनाच्या कार्यक्रमाने उपस्थितांचे इतके मनोरंजन केले की, प्रत्येक गाण्यावर वन्स मोअर म्हणत सगळ्यांनी ठेका धरला. सुजय विखे पाटील यांनी देखील वन्स मोअर म्हणत नागरिकांच्या समवेत आनंद लुटला. दरम्यान अजय अतुल यांनी गायलेल्या विठ्ठलाच्या गाण्यावर तर शिर्डीत अतिशय भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

तसेच हास्य जत्रा फेम शिवाली परब आणि गौरव मोरे यांनी देखील आपल्या कॉमेडीने उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्यासमवेत गोपीनाथ बापूंनी देखील तुफान कॉमेडी करत नागरिकांना पोट धरून हसण्यासाठी भाग पाडले. या तुफान कॉमेडीच्या कार्यक्रमाने वातावरण अगदी फुलून गेले होते. उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या कलाकारांचे कौतुक केले. 

दरम्यान सर्व उपस्थित नागरिकांनी सुजय विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचे सदरील कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत मनापासून आभार मानले आणि या कार्यक्रमाचा मनसोक्तपणे आनंद लुटला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !