भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
◻️ शिर्डीतून विखे पाटील तर शिवाजी कर्डिलेना राहूरी मतदारसंघातून उमेदवारी
संगमनेर LIVE | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भाजपाने ९९ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपाने पुन्हा एकदा शिर्डी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर राहूरी मतदारसंघातून शिवाजी कर्डिले यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
या यादीनुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील जेष्ठ नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना शिर्डी मतदारसंघातून, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना राहूरी, राम शिंदे यांना कर्जत - जामखेड, मोनीका राजळे यांना शेवगाव, प्रतिभा पाचपुते यांना श्रीगोंदा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.
दरम्यान मंत्री विखे पाटील यांना तिकीट जाहिर होताचं मतदारसंघात कार्यकर्त्यानी जल्लोष साजरा केला आहे.
सविस्तर यादी..