आश्वी पंचक्रोशीचे श्रध्दांस्थान असलेल्या मोठेबाबा यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात
◻️ जंगी कुस्त्याची अंगावर शहारे आणि रोमांच उभी करणारी मेजवानी
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील आश्वी जिल्हा परिषद गटातील पिप्रीं - लौकी अजमपुर व आश्वी खुर्द तसचे पंचक्रोशीतील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री. क्षेत्र मोठेबाबा देवस्थानच्या तीन दिवसीय यात्रोत्सवाला आज बुधवारपासुन (दि. १५ जानेवारी) सुरुवात होत असल्याची माहिती यात्रा कमेटीचे अध्यक्ष आणि जेष्ठ नेते प्रा. कान्हु गिते यानीं दिली.
आश्वी खुर्द आणि पिप्रीं - लौकी अजमपुर गावाच्या सिमेवर तसेच शिबलापुर गुहा रस्त्यालगत उंच डोंगरावर मोठेबाबाचे मंदिर आहे. वर्षानुवर्षे ग्रामस्थ मोठ्या भक्तिभावाने दरवर्षी मोठा यात्राउत्सव साजरा करत आले आहे.
आज बुधवार ते शुक्रवार दरम्यान चालणाऱ्या यात्रात्सवात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये आज सांयकाळी छबिणा मिरवणुक काढून फटाक्याची अतिषबाजी केली जाणार आहे.
उद्या गुरुवारी (दि. १६) रोजी सकाळी श्री क्षेत्र मोठेबाबा परिसरातील विविध देव - देवतांना नारळ वाढविणे व उंब्रेश्वर रामेश्वर देवस्थानचे मंहत दत्तगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते चादर अर्पण करण्यात येणार आहे. सांयकाळी नैवद्य व होईकाचा कार्यक्रम तर रात्री तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे यांच्या मोफत लोकनाटय तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी (दि. १७) रोजी सकाळी हजऱ्या आणि दुपारी जंगी कुसत्याच्या रोमांचक लढतीनंतर यात्रेची सांगता होणार आहे.
दरम्यान दर्शन आणि यात्रोत्सवासाठी येणाऱ्या भाविकासाठी पार्किगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच शुक्रवारी होणाऱ्या जंगी हंगाम्यासाठी प्रशस्त मैदानाची उभारणी केली असुन पंचक्रोशीतील नागरीकानी या यात्रोत्संवाचा मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा. असे आवाहन यात्रा कमेटीचे अध्यक्ष प्रा. कान्हु गिते व पिंप्री - लौकी अजमपुर व आश्वी खुर्द ग्रामस्थानी केले आहे.